Video : महाजनांनी सेल्फी घेतला नसल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

गिरीश महाजन कोल्हापुरातून सांगलीत गेले. तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी जे कोल्हापुरातून त्यांना सोडण्यासाठी आले होते, त्यांना हात दाखवला. याचवेळी प्रसारमाध्यमांनी त्यांचे फोटो काढून दाखवले.

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

सांगली : सांगलीतील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन आले होते. तेव्हा त्यांनी बोटीतून सेल्फी व्हिडिओ घेतला होता. त्यावरून त्यांंच्यावर टीका केली जात होती. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गिरीश महाजन यांनी कोणताही सेल्फी घेतलेला नाही, असे सांगत महाजनांची पाठराखण करत मीडियावरच खापर फोडले.

सांगली येथे माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, सांगलीत भीषण पूरस्थिती पाहून मी स्वत: गिरीश महाजनांना सांगितले, की आम्ही कोणीही त्याठिकाणी पोहोचू शकत नाही.

आमचे हेलिकॉप्टर खाली उतरता येणे शक्य नाही. त्यामुळे तुम्ही कोल्हापुरातून तिथे जा आणि त्या ठिकाणी परिस्थिती सांगा. त्यानुसार गिरीश महाजन कोल्हापुरातून सांगलीत गेले. तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी जे कोल्हापुरातून त्यांना सोडण्यासाठी आले होते त्यांना हात दाखवला. याचवेळी प्रसारमाध्यमांनी त्यांचे फोटो काढून दाखवले.

 

उलट ज्या ठिकाणी लोक पोहचू शकत नाहीत. तिथे गिरीश महाजन पोहोचले. त्यामुळे लोकांना दिलासा मिळाला, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Devendra Fadnavis says Mahajan did not take selfie