घोटाळे लपविण्यासाठी कर्जमाफी मागणी- मुख्यमंत्री

टीम ई सकाळ
गुरुवार, 16 मार्च 2017

आधी याची हमी द्या

मुख्यमंत्री म्हणाले, "कर्जमाफीचे राजकारण करत आहेत. कर्जमाफी केल्यावर एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही याची हमी विरोधकांनी द्यावी."

मुंबई : "विरोधकांच्या नेतृत्वाखालील बँकांमधील घोटाळे लपविण्यासाठी ते कर्जमाफीची मागणी करीत आहेत," असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना केला. 

मुख्यमंत्री म्हणाले, "कर्जमाफीचे राजकारण करत आहेत. कर्जमाफी केल्यावर एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही याची हमी विरोधकांनी द्यावी. कर्ममाफी मागण्याचा अधिकार विरोधकांना नाही, भाजपला आहे. आम्ही कर्जमाफीच्या विरोधात नाही, तर कर्जमाफीच्या बाजूने आहोत. परंतु, कर्जमाफी केल्यास विकासासाठी पैसा उरणार नाही. एकूण 1 लाख 14 हजार कोटी रुपयांची कर्जे शेतकऱ्यांच्या नावे आहेत. त्यापैकी 31 हजार कोटी रुपयांची कर्जे थकीत आहेत. त्यामध्ये एकूण 1 लाख 57 हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे."
 
"मागील वेळी जी कर्जमाफी केली होती तो निर्णय राज्य सरकारने नव्हे तर केंद्र सरकारने घेतला होता. केंद्रीय अर्थमंत्री, कृषिमंत्री यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत," असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. 

विरोधकांना उत्तर देताना ते म्हणाले, "तुम्ही सत्तेत असताना पाच हजार कोटी रुपये दिले होते. आम्ही फक्त दुष्काळासाठी आठ हजार कोटी रुपयांचा निधी दिला होता."

Web Title: CM devendra fadnavis speaks on farmers loan waiver