शेती क्षेत्रात एक नवी पहाट : मुख्यमंत्री फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

शेती क्षेत्रासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. शेतीसाठी महत्त्वाचा कार्यक्रम राज्य सरकार सुरु करत आहे. शेतीचे क्षेत्र हे पारंपारिक असे आहे. पूर्वजांनी शेतीचे विज्ञान समजून शेती केली. पण, आता रासायनिक खतांच्या वापरामुळे, उत्पादन खर्च वाढल्यामुळे शेतीवर परिणाम झाल्याचे दिसते. शेती आता प्रशिक्षण व कौशल्याशिवाय होऊ शकत नाही.

मुंबई : छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास अभियानातून प्रशिक्षित शेतकऱ्यांची फौज उभी करून शेती क्षेत्रात परिवर्तन घडवून दाखवू. शेती क्षेत्रात एक नवी पहाट या माध्यमातून आपण आणत आहोत. खूप मेहनतीतून हा कार्यक्रम आखला आहे. आपण यामध्ये झोकून देऊन काम केले पाहिजे आणि यातून नवे मॉडेल तयार होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेने छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास अभियान सुरु केले आहे. या अंतर्गत राज्यभरातील शेतकऱ्यांनी गटशेती करण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. गटशेती करूया आणि संघटित होऊया असे आवाहन करत गटशेतीतून कौशल्य आणि समृद्धीचा मूलमंत्र देण्यात येणार आहे. राज्यभरातील 3 लाख शेतकऱ्यांना या प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे.

फडणवीस म्हणाले, की शेती क्षेत्रासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. शेतीसाठी महत्त्वाचा कार्यक्रम राज्य सरकार सुरु करत आहे. शेतीचे क्षेत्र हे पारंपारिक असे आहे. पूर्वजांनी शेतीचे विज्ञान समजून शेती केली. पण, आता रासायनिक खतांच्या वापरामुळे, उत्पादन खर्च वाढल्यामुळे शेतीवर परिणाम झाल्याचे दिसते. शेती आता प्रशिक्षण व कौशल्याशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे हा कार्यक्रम आखला आहे. प्रशिक्षित शेतकऱ्यांना शाश्वत शेतीकडे नेण्यासाठी हा कार्यक्रम आखला आहे. प्रशिक्षण दिल्यानंतर शेतकरी कंपन्या जोडल्या जाणार आहेत. आज वर्ल्ड बँकेच्या साहाय्याने दोन योजना सुरु करण्यात आल्या आहेत. दहा हजार गावांमध्ये अशी योजना सुरु करणार आहोत. गावोगावी कृषी व्यवसाय सुरु व्हावा यासाठी ही योजना सुरु केली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा त्याच्याशी संबंध जोडण्यात आला आहे. त्यामुळे शेतीला परिवर्तनाचा जोड मिळेल. 

Web Title: CM Devendra Fadnavis talked about farmers business skill development