शिवाजी महाराजांचे प्रत्यक्ष वंशज भाजपमध्ये: मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

शाहू महाराज घराण्याचे वंशज छत्रपती संभाजी राजे आधीच भाजपमध्ये आहेत. आज प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचे वंशज असलेले शिवेंद्रराजे भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रत्यक्ष वंशज असलेले शिवेंद्रसिंह राजे आज भाजपमध्ये येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांचे आज (बुधवार) मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्या नेत्यांवर स्तुतिसुमनही उधळली आहेत. या कार्यक्रमात शिवेंद्रसिंहराजे भोसले, वैभव पिचड, संदीप नाईक, कालिदास कोळंबकर या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर, चित्रा वाघ, मधुकर पिचड यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

शिवेंद्रराजेंच्या प्रवेशाबद्दल मुख्यमंत्री म्हणाले, की शाहू महाराज घराण्याचे वंशज छत्रपती संभाजी राजे आधीच भाजपमध्ये आहेत. आज प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचे वंशज असलेले शिवेंद्रराजे भाजपमध्ये दाखल झाले आहेत. मोदींनी राजगडावर जाऊन छत्रपतींचा आशीर्वाद घेतला होता, त्यानंतर ते पंतप्रधान झाले आहेत, याची आठवणही मुख्यमंत्र्यांनी यानिमित्तानं करून दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Devendra Fadnavis talked about ShivendraSinghraje Bhosle