CM Eknath Shinde: केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, CM शिंदेंनी बोलवली सर्व पक्षीय खासदारांची बैठक

ठाकरे गटाचे खासदार जाणार?
CM Eknath Shinde News
CM Eknath Shinde Newsesakal

CM Eknath Shinde News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सर्व पक्षीय खासदारांची बैठक बोलावली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आज सायंकाळी 5 वाजता सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक पार पडणार आहे.

CM Eknath Shinde News
पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; दुभाजक तोडून कार पलटी, CCTV Footage Viral

एकनाथ शिंदे अर्थसंकल्पाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील मुद्यांवर खासदारांशी करणार चर्चा करणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होत आहे.

या अधिवेशनात महाराष्ट्राच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सर्व खासदारांनी आवाज उठवाव, केंद्राकडे अडकून असलेल्या परवानग्या, निधी मिळावा यासाठी अधिवेशन आवाज उठवावा यासाठी ही बैठक होणार असल्याचे सांगितं जात आहे.

CM Eknath Shinde News
Baramati News: शिमला नाही ही तर आपली बारामती, गाव हरवलं धुक्यांच्या चादरीमध्ये..!

मात्र या बैठकीसाठी ठाकरे गटाचे खासदार उपस्थित राहणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, राज्याच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांना केंद्रीय पर्यावरण आणि वनविभागाची मान्यता, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर, दिशा कायद्याला मान्यता.

अशा महत्त्वाच्या विषयांवर सर्वपक्षीय खासदारांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याबाबत खासदारांना विनंती करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com