
CM Shinde: रंगांच्या धुळवडीत CM शिंदेंना शेतकऱ्यांची काळजी; म्हणाले...
राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकंट ओढावलं आहे. ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने बळीराजा हवालदील झाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही देत दिलासा दिला आहे. (CM Eknath Shinde damage crops farmer Dhulwad maharashtra politics )
मुख्यमंत्री शिंदे ठाण्यात कुटूंबासोबत धुळवड साजरी करताना पाहायला मिळाले. दरम्यान, शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.
Holi special : "रंग बरसे " नातवासंगे CM शिंदें रंगले रंगात ! फडणवीसांकडून देखील धुळवड साजरी !
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करा. असा आदेशही त्यांनी यावेळी दिला. तसेच, सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार वाशीम जिल्ह्यात रात्री वाशीमसह कारंजा, मानोरा, रिसोड आणि तालुक्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसामुळे रब्बीतील काढणीला आलेल्या गहू, हरभरा, पिकांसह भाजीपाला आणि संत्रा बागेच अतोनात नुकसान झाले आहे.
उभं पिक आडवं झाल्याचं पाहून शेतकऱ्याने तोंडाला घेतलं मारून, Video Viral
सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडीत झाला. दरम्यान अवेळी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकाच नुकसान झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.