CM शिंदे राज ठाकरेंच्या स्टाईलमध्ये व्हिडीओमधून उद्धव ठाकरेंना करणार एक्सपोज? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde

CM शिंदे राज ठाकरेंच्या स्टाईलमध्ये व्हिडीओमधून उद्धव ठाकरेंना करणार एक्सपोज?

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रत्नागिरीतील खेडमध्ये आज सभा होणार आहे. येथे शिवसेनेचा भगवा झंझावात उभा करण्यासाठी आज शहरातील गोळीबार मैदानावर भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या सभेच्या तयारीसाठी शिवसेना नेते रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार योगेश कदम तसेच हजारो शिवसैनिक गेले आठ दिवस रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत.

तालुक्यातील ग्रामीण भागात शिवसेनेचे भगवे झेंडे, पताका, बॅनर, कटआउट लावण्यात आले असून, सभेला येणाऱ्या शिवसैनिकांच्या सोयी-सुविधांसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

शहरात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाल्यावर त्या सभेला शिवसेनेकडून जशास तसे उत्तर देण्याचा निर्धार शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला आहे.

दरम्यान एकनाथ शिंदेच्या आजच्या सभेतून उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचे, पत्रकार परिषदेतील काही व्हिडीओ दाखवून या सभेतून उद्धव ठाकरे यांची पोलखोल केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

TV9 मराठीच्या वृत्तानुसार..

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची देखील व्हिडीओ दाखवत शिंदे गटाची पोलखोल केली होती. हीच खेळी आता एकनाथ शिंदे देखील आजमावणार आहेत. लाव रे तो व्हिडीओ सांगणाऱ्या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

यासभेला खेड-दापोलीसह संपूर्ण कोकणातील शिवसेनेचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज सभा घेऊन शक्तिप्रदर्शन करण्याची जोरदार तयारी केली आहे.

शहरातील एसटी मैदानात भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून, हजारो कार्यकर्ते या सभेत सहभागी होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन ऐकू शकतील, असे नियोजन स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

टॅग्स :CM Eknath Shinde