CM Eknath Shinde : उद्योगपतींच्या भेटींचं सत्र सुरूच; शिंदे - अदानींमध्ये रात्री उशिरा खलबतं! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde Gautam Adani
CM Eknath Shinde : उद्योगपतींच्या भेटींचं सत्र सुरूच; शिंदे - अदानींमध्ये रात्री उशिरा खलबतं!

CM Eknath Shinde : उद्योगपतींच्या भेटींचं सत्र सुरूच; शिंदे - अदानींमध्ये रात्री उशिरा खलबतं!

राज्यात सध्या उद्योग राज्याबाहेर जाण्यावरून गोंधळ सुरू आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं उद्योगपती भेटींचं सत्रही सुरू आहे. सत्तेत आल्यापासून रतन टाटा, मुकेश अंबानी अशा उद्योगपतींची भेट घेतल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी गौतम अदानी यांची भेट घेतली आहे.

हेही वाचा: Mumbai Local Update : प्रवाशांचा खोळंबा; CSMT कडे येणाऱ्या अनेक गाड्या रद्द

शिंदे आणि अदानी यांच्यात काल रात्री उशिरा दीड तास बैठक झाली. यावेळी त्यांच्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंत हेदेखील उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा या निवासस्थानी ही बैठक झाली. या भेटीत राज्याच्या विकासाबद्दल सकारात्मक चर्चा झाल्याचं उद्योगमंत्री सामंत यांनी सांगितलं. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवादही साधला.

हेही वाचा: LIVE Update: न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड होणार देशाचे 50 वे सरन्यायाधीश, राष्ट्रपती आज देणार शपथ

अदानी हे केवळ राज्यातलेच नव्हे तर देशातले एक मोठे उद्योगपती आहेत. त्यांच्यासोबत राज्याच्या विकासाबद्दल सकारात्मक चर्चा झाली, अशी माहिती सामंत यांनी दिली. तसंच गेल्या अडीच वर्षांच्या सरकारमध्येच हे सगळे प्रकल्प राज्याबाहेर गेले असून विरोधकांकडून उगाच बदनामी केली जात असल्याचंही सामंत यांनी सांगितलं.

टॅग्स :Eknath Shindegautam adani