भूखंड घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा दिलासा: Eknath Shinde | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde

Eknath Shinde: भूखंड घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा दिलासा

भूखंड घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्री असताना नागपूर न्यासाची 86 कोटींची जमीन बिल्डरांना अवघ्या 2 कोटी रुपयात विकल्याचा असा गंभीर आरोप गंभीर केला होता. (CM Eknath Shinde NIT Case Big Update nagpur )

याप्रकरणी नागपूर न्यायालयाच्या खंडपीठाने मुख्यमंत्र्यांना मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 जानेवारीला होणार आहे.

सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी नागपूरच्या न्यासाच्या भूखंड घोटाळ्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली होती.

मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना हा सर्व व्यवहार नियमानुसार जमिनीचा व्यवहार झाला आहे. कोर्टाने या व्यवहारावर कोणतेही ताशेरे ओढले नाहीत असं शिंदे यांनी स्पष्ट केलं होतं. मी माझ्या अधिकाराचा गैरवापर केलेला नाही. भूखंड प्रकरणात कोणताही गैरव्यवहार झालेला नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :CM Eknath ShindeNagpur