Eknath Shinde : 'डॉ. एकनाथ शिंदे'; मुख्यमंत्र्यांना मिळाली डॉक्टरेट

एकनाथ शिंदे यांना आपल्या योगदानाबद्दल डी. लिट ही पदवी मिळाली आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSakal

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज डी.लिट ही पदवी देण्यात आली आहे. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून ही पदवी त्यांना देण्यात आली आहे. आपला मुलगा जिथे शिकला, त्याच विद्यापीठाकडून डी.लिट पदवी मिळणं गौरवाची गोष्ट असल्याचंही शिंदे यांनी म्हटलं आहे. (Eknath Shinde News)

कधी विचार केला नव्हता पण विचार न करता बरंच काही मिळत गेलं. अशी पदवी मिळेल, असं मला वाटलं नव्हतं. डी. लिटसारखी प्रसिद्ध पदवी मला देण्याचं ठरवलं, यासाठी मी या विद्यापीठाचा आभारी आहे. मला डी वाय पाटील विद्यापीठाकडून ही पदवी मिळाल्याचा आनंद आहे, अशा भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते शिंदे यांना ही पदवी बहाल करण्यात आली आहे.

वैज्ञानिक रघुनाथ माशेलकर, आप्पासाहेब धर्माधिकारी, सिंधूताई सपकाळ अशा दिग्गज लोकांना या विद्यापीठाने पदवी दिली आहे. त्यानंतर आता त्यांनी मला हा सन्मान दिला, त्याबद्दल मी विद्यापीठाचा ऋणी आहे, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहे.

सामाजिक, आरोग्य आणि आपत्कालीन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांना डॉक्टरेट पदवी मिळाली आहे. यावेळी आपल्या भाषणात शिंदे म्हणाले,"हे काम करणं लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे. या जबाबदारीचा वापर सर्वसामान्य माणूस अडचणीत असताना करायचा असतो."

"आपण घरात बसायचं नसतं ही शिकवण मला बाळासाहेबांनी आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी दिली, कोरोनातही आम्ही काम केलं, जबाबदारीचं पालन केलं. २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण हे बाळासाहेबांचं सूत्र आम्ही पुढे नेलं. मी मुख्यमंत्री झालो तरी मी कालही कार्यकर्ता होतो, आजही आहे आणि उद्याही कार्यकर्ताच असेन", असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com