Shiv Sena : तेव्हाच शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देऊ केलं होतं, पण..CM शिंदेंचा मोठा खुलासा

उपमुख्यमंत्रीपदासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा गौप्यस्फोट
maharashtra politics
maharashtra politicsesakal

सत्तासंघर्षानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं आणि राज्यात नव्या राजकारणाला तोंड फुटलं. शिवसेनेचे कट्टर नेते म्हणून ओळखले जाणारे एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत पक्षाविरोधात बंड पुकारलं. त्यामुळे शिंदे गट आणि शिवसेना यांच्यामध्ये वितुष्ट मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसंदर्भात मोठा खुलासा केला आहे. (Cm Eknath Shinde Reveals Shivsena Offered Deputy Cm Post By Bjp Devendra Fadnavis In 2014 )

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांनी राज्यातील राजकारणावर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी २०१४च्या निवडणुकांवेळच्या घडामोडींविषयी मोठा खुलासा केला आहे.

''२०१४लाच भाजपानं शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देऊ केलं होतं. भिवंडीत झालेल्या एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस स्वत: मला म्हणाले होते की तुमच्याकडे नवीन जबाबदारी येणार आहे. पण मला माहिती होतं की शिवसेना हे पद स्वीकरणार नाही. तेव्हा उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं असतं, तर ते मला द्यावं लागलं असतं. त्यामुळेच ते पद तेव्हा शिवसेनेनं नाकारलं'' असा मोठा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

तसेच, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आमची युती होती. विधानसभेच्या वेळी काही जागांच्या वाटपावरून युती तुटली. ती कायम राहावी या मताचा मी होतो. पण दुर्दैवाने युती होऊ शकली नाही. शिवसेना व भाजप स्वतंत्रपणे लढले. पण नंतर दोघांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नव्हता. मी तेव्हा विरोधी पक्षनेता होतो. युतीसाठी प्रयत्न झाले, ते यशस्वी झाले आणि आम्ही सरकार बनवले. असही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com