CM Eknath Shinde : राज्यात मुख्यमंत्री नव्हे तर मख्खमंत्री आहेत - संजय राऊत | Cm Eknath Shinde Shivsena Mp Sanjay raut slams shinde over his government maharashtra politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde Sanjay Raut
CM Eknath Shinde : राज्यात मुख्यमंत्री नव्हे तर मख्खमंत्री आहेत - संजय राऊत

CM Eknath Shinde : राज्यात मुख्यमंत्री नव्हे तर मख्खमंत्री आहेत - संजय राऊत

Sanjay Raut on CM Eknath Shinde : शिंदे आणि ठाकरे यांचे आरोप प्रत्यारोप आणि दावे प्रतिदावे आता महाराष्ट्राला नवीन राहिलेले नाहीत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. त्यांनी शिंदे यांना मख्खमंत्री म्हटलं आहे.

माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंना (Eknath Shinde) टोला लगावला आहे. राऊत म्हणाले, "या राज्याला मुख्यमंत्री नाहीत. या राज्याला मख्खमंत्री आहेत. मुख्यमंत्री असते, तर राज्याची अशी अवस्था झाली नसती. सगळी सूत्रं सध्या उपमुख्यमंत्र्यांकडे आहेत. मुख्यमंत्री फक्त ४० खोकेबाज आमदारांना एकत्र ठेवण्याचं काम करतायत. बाकी काही करत नाहीयेत."

हेही वाचा - ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सभांबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले, "इथे अराजकाची ठिणगी पडली तर महाराष्ट्रात वणवा पेटेल हे त्यांना माहित आहे का? हे लोक महाराष्ट्राला खतम करायला निघालेत. आम्ही हे सहन करणार नाही. त्याविरोधात रान उठवायचं हे मविआने ठरवलं आहे. आता मविआच्या एकत्र सभा आणि उद्धव ठाकरेंच्याही स्वतंत्र सभा होतील."