Thackeray Group : "तुम्ही ऑपरेशन करत राहा आम्ही मुका मार देतो..." ; एकनाथ शिंदेंना ठाकरे गटाचा टोला

Uddhav Thackeray and Eknath Shinde
Uddhav Thackeray and Eknath ShindeSakal

डी वाय पाटील विद्यापीठाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी.लीट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यापूर्वी मी डॉक्टर होतो छोटे मोठे ऑपरेशन मी केले आहेत, असे एकनाथ शिंदे कार्यक्रमात म्हणाले होते. यावर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. 

डॉक्टरेट वैगरे आम्हाला सांगू नका. तुम्ही ऑपरेशन करत राहा आम्ही मुका मार देतो. डॉक्टरकी महाराष्ट्रात पायलीला पन्नास मिळत असतात. प्रत्येक भ्रष्टाचाराला डॉक्टरेट मिळते हा देशाचा अनुभव आहे, त्यामुळे डॉक्टरांची चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. 

Uddhav Thackeray and Eknath Shinde
Amruta Fadnavis: दाराला कुलूप, पोलिसांची नोटीस, जेलमधून सुटल्यावर अनिक्षा जयसिंघानी गेली कुठे?

एकनाथ शिंदे डॉक्टर झाले असतील पण त्यांनी आधी स्वत:वर शस्त्रक्रिया करावी, असे संजय राऊत म्हणाले. 

बदल्याचे राजकारण सुरू आहे. बदला घेण्यासाठी नरेंद्र मोदी ते अदानीला का वाचवत आहेत, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. 

Uddhav Thackeray and Eknath Shinde
CM Eknath Shinde: महिलेच्या आत्महत्येनंतर राज्य सरकारला जाग; CM शिंदेंनी घेतला महत्त्वाचा निर्णय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com