मुख्यमंत्र्यांनी तेरावेळा नियम तोडूनही भरला नाही दंड

वृत्तसंस्था
शनिवार, 15 डिसेंबर 2018

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांनी तब्बल तेरावेळा वाहतूकीचे नियम मोडूनही दंड न भरल्याची माहिती समोर आली आहे. हे माहिती अधिकाराच्या अधिकाराखाली दाखल केलेल्या याचिकेत उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांच्या वाहनांनी अतिवेगाने गाडी चालवली होती. या बाबतीत त्यांच्या वाहनावर आकारण्यात आलेला दंड रद्द करण्यात आला आहे. 

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांनी तब्बल तेरावेळा वाहतूकीचे नियम मोडूनही दंड न भरल्याची माहिती समोर आली आहे. हे माहिती अधिकाराच्या अधिकाराखाली दाखल केलेल्या याचिकेत उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांच्या वाहनांनी अतिवेगाने गाडी चालवली होती. या बाबतीत त्यांच्या वाहनावर आकारण्यात आलेला दंड रद्द करण्यात आला आहे. 

मिळालेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्र्यांच्या मोटारींनी एकूण 13 वेळा नियम मोडला आहे. मुख्यमंत्र्यांची गाडी एम.एच 01 सी.पी. 0037 आणि एम.एच 01 सी.पी. 0038 या मोटारींनी 12 जानेवारी 2018 ते 12 ऑगस्ट 2018 या दरम्यान बांद्रा वरळी सी-लिंकच्या आसपास या नियमांचा भंग केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वाहनांनी नियम तोडल्याची घटना सीसीटीव्हीमध्येही कैद झाली आहे. नियमानुसार वेगाचा नियम मोडल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येतो. म्हणजेच हा नियम मुख्यमंत्र्यांच्या मोटारीने एकूण 13 वेळा मोडला आहे. यानुसार त्यांना 13 हजार रुपये दंड आकारणे अपेक्षित आहे. परंतु वाहतूक पोलिसांनी दंडाचे चलनच रद्द केले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद यांनी दाखल केलेल्या याचिकेत ही माहिती उघड झाली आहे.

Web Title: Cm fadanavis convoy cars violated traffic rules cancelled all fines