esakal | चारा छावणीच्या अनुदानवाढीस मुख्यमंत्र्यांचा दुजोरा : शरद पवार
sakal

बोलून बातमी शोधा

चारा छावणीच्या अनुदानवाढीस मुख्यमंत्र्यांचा दुजोरा : शरद पवार

- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता दुष्काळी दौरा.

- या भागातील जनतेच्या समस्या मांडल्या मुख्यमंत्र्यांसमोर.

चारा छावणीच्या अनुदानवाढीस मुख्यमंत्र्यांचा दुजोरा : शरद पवार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : चारा छावणीचे अनुदान प्रति जनावर 90 रुपये इतके आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते वाढवून 100 रुपये करण्यास दुजोरा दिला. मात्र, चारा छावण्यांतील एकूण खर्च पाहता ते रुपये 120 प्रति जनावर इतके करावे, ही बाब दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने आग्रहाने त्यांच्यासमोर मांडली, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विटरवरून सांगितले.

सोलापूर, बीड व सातारा जिल्ह्यातील काही गावांना शरद पवार यांनी भेटी दिल्या. या भेटीदरम्यान तेथील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांच्या समस्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर आज (बुधवार) 'वर्षा'वर मांडल्या. त्यानंतर त्यांनी ट्विटरवरून सांगितले, की प्रामुख्याने पिण्याचे पाणी हे पुरेसं, नियमित व वेळेवर न मिळणं ही समस्या त्यांच्यासमोर अधोरेखित केली. कमी अधिक प्रमाणात होणे, त्याचबरोबर अशुद्ध पाणीपुरवठा ही अडचण आहे.

तसेच टँकरसाठी पाणी भरताना विजेची समस्या उद्भवल्यास पाणीपुरवठ्यावर परिणाम होताना दिसतो, ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली, असे त्यांनी यावेळी सांगितले.

loading image