...अन् आम्ही एकमेकांचीच जिरवत राहिलो : मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

आम्ही 'पाणी अडवा आणि पाणी जिरवा'ची घोषणा विसरलो आणि एकमेकाचीच जिरवत राहिलो.

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

पुणे : माझे मित्र राज ठाकरे यांना एक प्रश्न पडला, की एवढे वर्ष आपण प्रयत्न करत होतो. तर जलसंधारणाची कामं का झाली नाही ? याला कारणीभूत लोकं नाहीत. याला कारणीभूत आम्ही आहोत. सरकारने एक घोषणा दिली होती, की 'पाणी अडवा आणि पाणी जिरवा'. मात्र, आम्ही 'पाणी अडवा आणि पाणी जिरवा'ची घोषणा विसरलो आणि एकमेकांचीच जिरवत राहिलो, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

पानी फाऊंडेशननिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, पुढच्या वर्षी निवडणुका होत आहेत, म्हणून जलसंधारणाची काम करायची की नाही, असा प्रश्न आमीर खानला पडला होता. मात्र, मी आमीरजीला वचन देतो, की जिथे पाणी आहे, तिथे आम्ही सर्व एक आहोत, पाणी फाऊंडेशन, वॉटर कपचे कोणीही राजकारण करणार नाही, असे मी आम्हासर्वांच्या साक्षीने वचन देतो.

आत्तापर्यंत जलसंधारणाची कामं झाली नाहीत, या परिस्थितीला लोकं कारणीभूत नसून, आम्ही आहोत. सरकारने एक घोषणा दिली होती, की 'पाणी अडवा आणि पाणी जिरवा'. मात्र, आम्ही 'पाणी अडवा आणि पाणी जिरवा'ची घोषणा विसरलो आणि एकमेकांचीच जिरवत राहिलो, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. 

Web Title: CM Fadnavis criticizes Oppositions in paani foundation