आणीबाणीचे पाठीराखे आता विरोधात बोलतात 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

ठाणे - शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या "सामना'वर बंदी घालण्याची आमची भूमिका नव्हती. या निमित्ताने उद्धव ठाकरे यांना आणीबाणीची आठवण झाली आहे. पण आणीबाणीच्या विरोधात बोलण्याचा अधिकार उद्धव यांना आहे का, असा सवाल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणीबाणीला शिवसेनेने पाठिंबा दिल्याची आठवण करून दिली. यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी प्रथमच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. 

ठाणे येथे भाजप गटप्रमुखांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रथमच उघडपणे युती नको, अशी भूमिका घेतल्याने सिंहाची छाती दाखविणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ देण्याकरिता ठाण्यात राज्यातील महापालिकांच्या प्रचाराचा शेवट केल्याचेही या वेळी मुख्यमंत्री म्हणाले. फडणवीस म्हणाले, की माझे वडील 19 महिने तुरुंगात होते. त्या वेळी तुम्ही आणीबाणीला पाठिंबा दिला होता. आणीबाणीच्या काळात जनसंघाचे कार्यकर्ते दीड - दोन वर्षे तुरुंगात गेल्याने आणीबाणीविरोधातील भूमिका शिकण्यासाठी आम्हाला इतरांची गरज नाही. आणीबाणीच्या विरोधात बोलणाऱ्यांनी आणीबाणीला पाठिंबा दिला होता, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी थेट बाळासाहेब ठाकरेंनाच लक्ष्य केले. 

मुख्यमंत्री म्हणाले, की शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख मिळविण्याच्या प्रयत्नात असलेला ठाणे जिल्हा भाजपचा बालेकिल्ला होता. पण राष्ट्रवादाचा विचार करून शिवसेनेशी युती झाल्यानंतर येथील अनेक जागा शिवसेनेला मोठ्या मनाने भाजपने दिल्या. त्या वेळी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांना ताकद देण्याचे काम भाजपने केले. मात्र दिघेंची शिवसेना आता ठाण्यात राहिलेली नाही. भविष्यात ठाण्यात सर्वत्र कमळच फुलेल, असा विश्‍वासही या वेळी त्यांनी व्यक्त केला. 

गुंडशाहीला उत्तर द्या 
भाजपचा प्रयत्न देशातील लोकशाही वाचविण्याचा आहे. अशावेळी निवडणुकीच्या काळात कोणत्याही राजकीय पक्षाच्या गुंडशाहीला जशास तसे उत्तर द्या, असे आवाहन करतानाच लोकशाहीची कासही सोडू नका, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना दिला. निवडणुकीत लढताना कोणतीही भीती मनात ठेवू नका, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

Web Title: CM for the first time has led to write without naming Bal Thackeray