मुख्यमंत्र्यांचे मुंबईत ठाण! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

मुंबई - मुंबई महापालिकेत शिवसेनेचा महापौर होणार की भाजपचा, याकडे मुंबईसह राज्याचेही लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतच ठाण मांडले आहे. दोन्ही पक्षांनी पालिकेतील सत्तेसाठी, महापौरपदासाठी दावा केला आहे. दोन्ही पक्षांत वरवर शांतता दिसत असली, तरी सत्तेची जुळवाजुळव सुरू आहे. आठ मार्चपर्यंत "वेट अँड वॉच' अशी भूमिका घेत दोन्ही पक्ष धक्कातंत्राचा अवलंब करण्याच्या पवित्र्यात आहेत. 

महापालिकेची मुदत 8 मार्चला संपत आहे, त्यामुळे 9 मार्चपर्यंत महापालिकेतील सत्तेच्या गणितांची जुळवाजुळव करून महापौरपदासाठी निवडणूक होईल. पालिकेत आमचाच महापौर होईल, असा दावा भाजपने केला होता. 6 मार्चला महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरले जातील. मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेसशी युती करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. महापालिकेत पुन्हा शिवसेना- भाजपचीच युती व्हावी, यासाठी भाजपचे नेते नितीन गडकरी आग्रही आहेत. चार अपक्षांनी पाठिंबा दिल्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ 88 वर पोचले आहे. गतवेळी अखिल भारतीय सेनेने शिवसेनेला पाठिंबा दिला होता. पुन्हा त्यांची साथ मिळाल्यास हे संख्याबळ 89 होईल. 82 जागांवर यश मिळवलेल्या भाजपला किती अपक्षांचा पाठिंबा आहे किंवा कोणत्या पक्षाचा पाठिंबा आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीत कॉंग्रेससह इतर पक्ष व अपक्षांना महत्त्व आले आहे. फडणवीस आज रविवारीही मुंबईतच असल्याचे सांगण्यात आले. ते शिवसेनेच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत, असे सूत्रांनी सांगितले. सत्तेची जुळवाजुळव करण्यासाठी शिवसेना आणि भाजपने जोरदार हालचाली सुरू केल्याचे समजते. 

Web Title: CM in Mumbai