मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर निवडणूक प्रचाराची धुरा

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

दिवसाला पाच ते सहा सभांचा धडाका
मुंबई - राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये 212 नगर परिषद निवडणुकांच्या प्रचाराची सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर आहे.

दिवसाला त्यांनी पाच ते सहा सभांचा धडाका लावला आहे. "मिनी विधानसभा' म्हणून पाहिल्या जात असलेल्या या निवडणुकीसाठी फडणवीस संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. मुख्यमंत्री प्रचारासाठी व्यग्र असल्याने या आठवड्याची मंत्रिमंडळ बैठकही पुढे ढकलण्यात आली आहे.

फडणवीस यांनी नगरपालिका निवडणुका प्रतिष्ठेची केली आहे. विरोधी पक्ष म्हणून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्वच प्रमुख नेते प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. अशावेळी भाजपचे स्टार प्रचारक म्हणून फडणवीस सर्व ताकदीने मैदानात उतरले आहेत. सरकारने दोन वर्षांत केलेल्या कामाचा पाढा ते जनतेसमोर वाचत आहेत. राज्यात भाजपचे सरकार असल्याने नगरपालिका भाजपच्या ताब्यात दिल्यास त्याचा फायदा त्या शहराला होईल हे सांगण्याची जबाबदारीही ते घेत आहेत. अमरावती, हिंगोली, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्याचा दौरा करीत त्यांनी सभा घेतल्या.

भाजप सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे सरकारचे मूल्यमापन या निवडणुकीच्या माध्यमातून होणार आहे. शिवाय नोटाबंदीमुळे ग्रामीण भागात नाराजी असल्याचे मानले जाते. ही नाराजी कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या मैदानात उडी घेतल्याची चर्चा आहे. शिवाय राज्यात क्रमांक एकचा पक्ष बनून जनमत भाजपच्या बाजूला ठेवण्याची कसरत त्यांनाच करावी लागणार आहे. मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेबरोबरच कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसला रोखण्याचे आव्हान त्यांच्या समोर आहे.

Web Title: CM responsibility for election campaign