मातोश्रीबाहेर घोषणा देणाऱ्या आजीबाईंची मुख्यमंत्री घेणार भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cm uddhav thackeray  and family meet chandrabhaga shinde challenging Navneet rana ravi rana at matoshri

मातोश्रीबाहेर घोषणा देणाऱ्या आजीबाईंची मुख्यमंत्री घेणार भेट

राज्यात हनुमान चालिसा पठणावरून राजकारण चांगलेच तापले आहे, या प्रकरणात शिवसेना आणि आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे दिसून आले. यातच मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याच्या राणा दाम्पत्याच्या घोषणेनंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते यानंतर त्यांना रोखण्यासाठी शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर गर्दी केली होती. या दरम्यान या शिवसैनिकांच्या गर्दीत एका आजींची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

चंद्रभागा शिंदे असे नाव असलेल्या आजीबाईंची ठाकरे कुटुंबीय भेट घेणार आहेत. त्या शिवडी येथे राहणाऱ्या असून त्या मागच्या अनेक वर्षांपासून शिवसेनेशी जोडल्या गेल्या असल्याचे त्यांनी सांगितले. तळपत्या उन्हात मातोश्रीबाहेर थांबून राणा दाम्पत्याचा विरोध त्या करत होत्या. त्यामुळे काहीवेळ त्यांना मातोश्रीमध्येही बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर आता ठाकरे कुटुंबीय त्यांची भेट घेणार आहेक दरम्यान, या आजीबाईंना पाहून शिवसेना कार्यकर्त्यांनीही रवी राणा कायर आहे, आजी आमची फायर आहे, अशा घोषणा दिल्या होत्या. या वेळी चंद्रभागा यांनी राणा दांपत्याला पुष्पास्टाईल इशारा दिला. झुकेगा नही साला, असे देखील म्हणाल्या होत्या.

हेही वाचा: ".. है क्या हिम्मत?"; नितेश राणेंचं शिवसेनेच्या नेत्यांना आव्हान

याच आजींची दखल घेत नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्विट केलं आहे. त्यांनी आजींची स्तुती करत "येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी गेले 2-3 दिवस मातोश्रीच्या बाहेर तुफान गर्दी होती. त्या गर्दीत एक 92 वर्षाची म्हातारी आजी देखील उभी होती. तीचे वय बघितले तर ती त्या गर्दीत काय करत होती, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येईल. पण ह्यालाच म्हणतात निष्ठा! शिवसेनेची सर्वात मोठी ताकद." असे म्हटले आहे.

इतकेच नाही तर त्यांनी, "आजकालच्या जगात तळहातावरच्या फोडासारखे जपलेली लोक ही कधी पाठीत खंजीर खुपसतील हे सांगता येत नाही. मी त्या आजींच्या घरी जाऊन त्यांची भेट घेणार व त्यांच्या पाया पडणार. की अशीच निष्ठा माझ्या हृदयी राहो." अशी भावना व्यक्त केली आहे. सोबतच "हे भाग्य फक्त बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार ह्यांच्या नशिबी आहे " असे देखील आव्हाड म्हणाले आहेत.

हेही वाचा: ओला इलेक्ट्रिकचा मोठा निर्णय; परत मागवले 1,441 इलेक्ट्रिक स्कूटर

Web Title: Cm Uddhav Thackeray And Family Meet Chandrabhaga Shinde Challenging Navneet Rana Ravi Rana At Matoshri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top