esakal | राज ठाकरेंचा मुद्दा मुख्यमंत्र्यांना पटला, पोलिसांना केली सूचना
sakal

बोलून बातमी शोधा

Raj and Uddhav thackeray

राज ठाकरेंचा मुद्दा मुख्यमंत्र्यांना पटला, पोलिसांना केली सूचना

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: साकीनाका बलात्कार प्रकरणाच्या (sakinaka rape case) पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी काल गृहविभागाची (Home ministry) महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला पोलीस अधिकारीही (police officers) उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत गुन्हेगारीला पायबंद आणि महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांचे चुलत बंधु राज ठाकरे सातत्याने परप्रांतीयांची नोंद ठेवण्याची मागणी करत असतात. साकीनाका घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी या मागणीची दखल घेत राज्याच्या गृहविभागाला महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. महिलांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. माता, भगिनी सुरक्षित राहिल्या पाहिजेत. गुन्हा करणाऱ्यांवर वचक बसवा, असे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.

हेही वाचा: ...तर मोदी सरकारही कोसळेल - अण्णा हजारे

मुख्यमंत्र्यांनी गृहविभागाला केलेल्या महत्त्वाच्या सूचना

- गुन्ह्यात रिक्षाचा वापर होतो. त्यामुळे रिक्षांच्या अनधिकृत हस्तांतरणाला पायाबंद घाला.

- रिक्षा हस्तांतरण करताना ती माहिती पोलीस स्टेशनला द्यावी लागणार.

- इतर राज्यातून येणाऱ्या परप्रांतीयांची नोंद ठेवावी लागेल.

- जलदगती न्यायालयातून निकाल येतो. मात्र शिक्षा प्रक्रियेत सुधारणा आवश्यक आहे.

- शक्ती कायदा संयुक्त समितीचा अहवाल आगामी अधिवेशनात मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- महिलांच्या छोट्या-मोठ्या तक्रारींकडे अजिबात दुर्लक्ष करु नका, असे त्यांनी सांगितले.

loading image
go to top