कोरोना काळातील सरकारचे कौतुक सर्वांनी केले, हे कौतुक माझे नाही, हे महाराष्ट्राचे कौतुक आहे पण काही जणांना आपले कौतुक परवडत नाही, असा टोला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लगावलाय. जालना येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या एका वास्तुच्या लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.
"काही जणांना आपले कौतुक परवडत नाही त्यामुळे त्यांना खणुन काढायचं असतं. काय काढायचे ते काढा, असेही मुख्यमंत्री म्हणाले. कोरोना काळात जास्तीत जास्त सेवा आपण देऊ शकलो त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. प्राण वाचलेल्यांची संख्या ही आरोप करणाऱ्यांपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. म्हणून आरोप करणाऱ्यांना किंमत देण्याची गरज नाही." असेही ते म्हणाले.
सोबत मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे कौतुक केले. विरोधकांना सरकारी आरोग्य केंद्रात अगदी फुटक तपासणी करुन देऊ, असा खोचक टोलासुध्दा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रसंगी लगावला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.