मुख्यमंत्री ठाकरेंची पंतप्रधानांकडे मागणी, म्हणाले...

महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजन हवा असून रेमडेसिव्हिरचाही पुरेशा प्रमाणात पुरवठा होणे गरजेचे आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray File Photo

मुंबई : महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजन हवा असून रेमडेसिव्हिरचाही पुरेशा प्रमाणात पुरवठा होणे गरजेचे आहे. विमानाने ऑक्सिजन आणणे शक्य नसल्यास वेळ वाचविण्यासाठी रिकामे टँकर विमानाने प्लॅंटच्या ठिकाणी पाठवावेत आणि ऑक्सिजन भरून झाल्यानंतर इतर मार्गाने ते राज्याला मिळतील अशी सोय करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत केली. ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्याने त्यांना संसर्ग रोखता आला. आपल्याकडे लस उत्पादक कंपन्यांची मर्यादित क्षमता पाहता त्यामुळेच इतर देशांतून उत्पादन होत असलेल्या लशी आम्ही आयात करून लसीकरण अधिक गतीने वाढवू शकतो का? यावर मार्गदर्शन करावे. रेमडेसिव्हिर किती उपयुक्त आहे ते सांगता येत नाही पण ते रुग्णांचा रुग्णालयांतील कालावधी निश्चितपणे कमी करत आहे. त्यादृष्टीने राज्याला रुग्ण संख्येनुसार त्याचा पुरेसा पुरवठा व्हावा असेही ठाकरे यांनी सांगितले.

Uddhav Thackeray
'उद्धव ठाकरे होणं अवघड', जितेंद्र आव्हाडांनी केला सलाम

पंतप्रधानांनी लॉकडाउनकडे शेवटचा पर्याय म्हणून पाहावे अशी सूचना राज्यांना केली आहे. महाराष्ट्रासाठी दुर्दैवाने असे कडक निर्बंध लावण्याची वेळ आली आहे मात्र आम्ही अर्थचक्राला झळ बसू नये याची देखील काळजी घेत आहोत असे स्पष्ट करून मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही लढाई आम्ही कोणत्याही परिस्थितीत जिंकूच असा आत्मविश्वास व्यक्त केला. राज्यात मोठ्या प्रमाणावर निवृत्त डॉक्टर, परिचारिका यांची देखील मदत घेण्यात येत असून रुग्णांस तत्काळ योग्य ते उपचार मिळावेत म्हणून टेलिमेडिसीन व टेली आयसीयूवर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Uddhav Thackeray
पुण्यात ऑक्सिजन प्लँटसाठी १३ कोटींचा निधी

उद्धव ठाकरे म्हणाले

  • वैद्यकीय विद्यार्थी मदतीसाठी सरसावले

  • रेमडेसिव्हिरचा पुरवठा सुरळीत केला जावा

  • विषाणूच्या दुहेरी उत्परिवर्तनाचा अभ्यास आवश्यक

  • कोविड सुसंगत वर्तनावर कायमस्वरूपी भर देणार

  • २५० ते ३०० मेट्रीक टन अतिरिक्त ऑक्सिजन हवा

  • केंद्राने १३,००० जम्बो सिलेंडर, ११०० व्हेंटिलेटर द्यावेत

  • लशींचा शाश्‍वत, नियमित पुरवठा होणे गरजेचे

  • ‘सीएसआर’द्वारे उत्पादकांकडून लस खरेदी हवी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com