राज्यपालांचे आभार, पण...; जाता जाता उद्धव ठाकरेंचा टोमणा

लोकशाहीचा मान राखल्याबद्दल राज्यपालांचे आभार असं म्हणत त्यांनी टोमणा मारला आहे.
Uddhav Thackeray Bhagatsingh Koshyari
Uddhav Thackeray Bhagatsingh KoshyariSakal

राज्यातील महाविकास आघाडीकडे विधानसभेत बहुमत आहे की नाही हे ठरविण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन गुरुवारी (३० जून) नियोजित वेळेतच बोलवा असा महत्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

(CM Uddhav Thackeray Resignation)

राजीनामा देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आभार मानतानाच विधान परिषदेतील १२ आमदारांसाठी दिलेली यादीही तत्परतेने मंजुर केली असती तर आनंद द्विगुणित झाला असता, असा टोलाही लगावलाय.

Uddhav Thackeray Bhagatsingh Koshyari
ठाकरेंचा मास्टरस्ट्रोक: मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारचे 10 मोठे निर्णय

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. दगा देणार असे वाटत ते सोबत राहिले. ज्यांना दिलं ते नाराज आहेत, पण ज्यांना नाही दिले ते सोबत राहिले असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे गटावर निशाणा साधला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले, मी राज्यपालांचे आभार मानतो. पत्र मिळाल्याच्या २४ तासांमध्येच त्यांनी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले. पण याच राज्यपालांकडे विधान परिषदेतील १२ जागांसाठी यादी होती. ही यादी त्यांनी आत्ता जरी मंजूर केली असती तर आम्हाला आनंद झाला असता, असा टोलाही त्यांनी लगावला.

नवीन लोकशाहीचा पाळणा हलणार

उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांच्या घराबाहेर सीआरपीएफच्या जवानांना तैनात करण्यात आलंय. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, मला त्यांच्याशी वाद नकोय. मुंबईत बंदोबस्त वाढवला स्थानबध्द करत नोटीस आल्या. चीन सीमेची सुरक्षा कदाचित मुंबईत. इतक नाते तोडले. शिवसैनिकांनी त्यांच्यामध्ये येऊ नये. नवीन लोकशाहीचा पाळणा हलणार आहे. मी सांगतो तुमच्या मध्ये कुणी येणार नाही. शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला खेचण्याचे पुण्य त्यांच्या पदरी पडू द्या. त्यांचा आनंद मला हिसकावून घ्यायचा नाही.

Uddhav Thackeray Bhagatsingh Koshyari
Maharashtra Politics LIVE: आघाडी सरकार कोसळलं; सेनेची तलवार म्यान

अशोक चव्हाण

मंत्रिमंडळ बैठकीत अशोकराव म्हणाले आम्ही बाहेर पडतो. काल पण आवाहन केले तुमची नाराजी कोणावर आहे? ति सुरतला गुवाहटीला जाऊन सांहण्यापेक्षा मातोश्री समोर येऊन बोला. मला समोरासमोर हवय. त्यांच्याशी वाद नकोय. मुंबईत बंदोबस्त वाढवला स्थानबध्द करत नोटीस आल्या. चीन सीमेची सुरक्षा कदाचित मुंबईत. इतक नाते तोडले. कुणीही शिवसैनिकांनी यांच्या मध्ये येऊ नये. नविन लोकशाहीचा पाळणा हलणार आहे. मी सांगतो तुमच्या मध्ये कुणी येणार नाही. किती आमदार आहे लोकशाहीत डोकी फक्त मोजण्यासाठी होतो. माझ्या विरोधात एक जरी उभा झाला तर मला लाजिरवाणे. मला उद्याचा खेळच करायचा नाही. शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला खेचण्याचे पुण्य त्यांना पदरी पडू द्या. त्यांचा आनंद मला हिसकावून घ्यायचा नाही.

शरद पवार, सोनिया गांधींचे आभार

शरद पवार, सोनिया गांधी आणि अन्य सहकाऱ्यांचे धन्यवाद. आज मंत्रीमंडळ बैठकीत शिवसेनेचे चारच मंत्री होते. आज होते कुणीही विरोध केला नाही. ज्यांनी करायचे होये ते नामानिराळे ज्यांचा विरोध भासवला त्यांनी समर्थन, असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com