मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधान मोदींना प्रस्ताव ! बळीराजासाठी केली तीन हजार 721 कोटींची मागणी

तात्या लांडगे
Friday, 25 December 2020

केंद्राला पाठविला मदतीचा प्रस्ताव
राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केंद्रीय पथकाने नुकतीच केली. त्यानुसार राज्य सरकारने केंद्र सरकारकडे तीन हजार 721 कोटी रुपयांची मदत मागितली आहे.
- सुभाष उमराणीकर, उपसचिव, मदत व पुनर्वसन, मुंबई

सोलापूर : राज्यातील 34 जिल्ह्यांमधील 62 लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. त्यानंतर राज्य सरकारकडे पाच हजार 998 कोटींच्या भरपाईचे प्रस्ताव शासनाला प्राप्त झाले. त्यानुसार पहिल्या टप्प्यात दोन हजार 297 कोटींची मदत मिळाली तर आता दुसऱ्या टप्प्यात दोन हजार 211 कोटींची मदत दिली जाणार आहे. परंतु, अतिवृष्टीमुळे बहुतांश शेतकऱ्यांचे 33 टक्‍क्‍यांहून अधिक नुकसान झाल्याने 'एनडीआरएफ'मधून तीन हजार 721 कोटींची मदत द्यावी, असे पत्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे.

 

केंद्राला पाठविला मदतीचा प्रस्ताव
राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केंद्रीय पथकाने नुकतीच केली. त्यानुसार राज्य सरकारने केंद्र सरकारकडे तीन हजार 721 कोटी रुपयांची मदत मागितली आहे.
- सुभाष उमराणीकर, उपसचिव, मदत व पुनर्वसन, मुंबई

 

परतीच्या पावसामुळे खरीप व लेट खरीप हंगामातील एकूण 59 हजार 282 हेक्‍टरवरील कांदा खराब झाला. तर फळबागांनाही पावसाचा मोठा फटका बसला. कापूस, मका यासह अन्य पिके पाण्याखाली गेली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांनी, विरोधी पक्षनेत्यांसह अनेकांनी अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मदतीची ग्वाही दिली होती. या पार्श्‍वभूमीवर 21 आणि 22 डिसेंबरला केंद्रीय पथकाने नुकसानीची पाहणी करुन नुकसानग्रस्तांशी संवाद साधला. केंद्र सरकारने अतिवृष्टीने नुकसान झालेल्या बळीराजासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनातून (एनडीआरएफ) मदत मागितली आहे. दरम्यान, नुकसान झाल्यानंतर दोन महिन्यांनी केंद्रीय पथकाने पाहणी केली. त्यामुळे मदतीसाठी केंद्र सरकारने विलंब करु नये, अशी अपेक्षा राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे. तत्पूर्वी, राज्य सरकारने पुरवणी मागणीद्वारे अधिवेशनात मंजूर केलेली दुसऱ्या टप्प्यातील मदत जानेवारी 2021 मध्ये नुकसानग्रस्तांच्या खात्यात वर्ग केली जाणार असल्याचेही मदत व पुनर्वसन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील नुकसानीची स्थिती

  • एकूण बाधित शेतकरी
  • 62.17 लाख
  • नुकसानीचे प्रस्ताव
  • 5,989 कोटी
  • राज्याकडून मिळालेली मदत
  • 2,297 कोटी
  • केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव
  • 3,721 कोटी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Uddhav thakare's proposal to PM Modis! Demand of Rs 3,721 crore made for farmer