महत्त्वाचे पाऊल; आता सर्व पंपांवर मिळणार 'सीएनजी'! 

महत्त्वाचे पाऊल; आता सर्व पंपांवर मिळणार 'सीएनजी'! 

पुणे : सर्व पेट्रोल पंपांवर 'सीएनजी' मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. केंद्र सरकारने यासंदर्भातील आदेश प्रसिद्ध केला आहे. यामुळे नेहमीच्या पेट्रोल पंपांवर सीएनजीची विक्री करण्यासाठी जिल्हा प्रशासन किंवा महापालिकेची परवानगी घेण्याची गरज राहिलेली नाही. 

देशामध्ये सीएनजीवर धावणाऱ्या वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असली, तरीही पंपांची संख्या त्या तुलनेत कमी आहे. वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी काय केलं पाहिजे, या प्रश्‍नाचं स्वाभाविक उत्तर म्हणजे सीएनजीच्या वापराला प्रोत्साहन!

पण उत्सर्जनासाठी सर्वाधिक कारणीभूत असलेले डिझेल स्वस्त आणि सर्वत्र उपलब्ध असते आणि सीएनजीच्या सार्वत्रिक विक्रीचा विषय प्रलंबित होता. 

यासंदर्भात 'सकाळ'ने गेल्या वर्षी एका वृत्तमालिकेतून हा विषय लावून धरला होता. 'सीएनजीच्या विक्रीला जिल्ह्यातील सर्व पंपांवर परवानगी देण्यात कोणतीही अडचण नाही; पण ऑईल कंपन्यांनी यासंदर्भात सकारात्मक निर्णय घ्यावा', असे मत त्यावेळी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी व्यक्त केले होते.

'सध्या कार्यरत असलेल्या पंपांमध्येच सीएनजीही विक्री करावी', असा आग्रह केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी धरला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com