कॉफीची जन्म कथा आणि बरंच काही

टीम ईसकाळ
Wednesday, 30 September 2020

कॉफी हे एक कल्चर आहे. कॉफी वेडे स्वत:ला चहावाल्यांपेक्षा उच्च दर्जाचे समजतात. टपरीवर कॉफी पिण्यात मजा नाही. टपरीवर प्यायचा तो चहाच आणि तो ही कट. मित्रमैत्रणींच्या घोळक्यात. कॉफी पिण्यासाठी मात्र हवा एकांत. आवडते पुस्तक आणि मंद संगीताची सोबत.

नागपूर : पंधराव्या शतकात येमेनमध्ये जन्माला आलेल्या कॉफीने आधी मध्य आशिया, उत्तर आफ्रिका आणि नंतर युरोपचा ताबा घेत आता अवघे विश्व व्यापले आहे.

कॉफी हे एक कल्चर आहे. कॉफी वेडे स्वत:ला चहावाल्यांपेक्षा उच्च दर्जाचे समजतात. टपरीवर कॉफी पिण्यात मजा नाही. टपरीवर प्यायचा तो चहाच आणि तो ही कट. मित्रमैत्रणींच्या घोळक्यात. कॉफी पिण्यासाठी मात्र हवा एकांत. आवडते पुस्तक आणि मंद संगीताची सोबत.

एक कप कॉफी प्यायली की कसं अगदी ताजंतवानं वाटतं. जगभरात कॉफीच्या चाहत्यांची कमी नाही. कॉफीचा सुगंध दरवळला की कॉफीवेड्याला राहावत नाही. कॉफीचे अनेक ब्रँड्‌स लोकप्रिय आहेत. तर अशी ही कॉफी फक्त पिण्यासाठीच योग्य आहे असं नाही तर त्या व्यतिरिक्तही कॉफीचे बरेच फायदे आहेत.
कॉफीमुळे ॲनझाईटी कमी होते, असे संशोधन सांगते. कॉफी त्वचेसाठी अत्यंत गुणकारी मानली जाते. कॉफीच्या सेवनाने लाभ होतातच पण कॉफीचा वापर सौंदर्यवर्धनासाठीही करता येतो.

* फेशियल स्क्रब म्हणून कॉफीचा उपयोग केला जातो. कॉफीचे कण त्वचेतील मृत कोशिकांना हळुवारपणे दूर करतात. कॉफी स्क्रब बनवणं अगदी सोपं आहे. एक चमचा कॉफीमध्ये थोडं ऑलिव्ह ऑईल मिसळा की झालं स्क्रब तयार ! हे स्क्रब त्वचेवर हलक्या हाताने चोळा. सर्व मृत पेशी निघून जातील.
* केसांच्या मुळाशी असलेल्या मृत कोशिकांमुळेही त्रास होऊ शकतो. टाळूवरील त्वचेच्या स्वच्छतेविषयी खूप काही बोललं जात असलं तरी त्याकडे तितकं लक्ष दिलं जात नाही. याच कारणास्तव केस कोरडे होतात आणि कोंड्याच्या प्रमाणातही वाढ होते. टाळूवरील मृत कोशिकांचं प्रमाण कमी करण्यासाठी कॉफीचे कण या त्वचेवर घासावेत. त्याने डोक्याच्या त्वचेवरील मृत कोशिका निघून जातात. अर्थात टाळूवरील त्वचा खूप नाजूक असल्यामुळे ही कृती हलक्या हातांनी करायला हवी.

सविस्तर वाचा - हिरव्या आणि काळ्या रंगाचे तांदूळ बघितले आहेत? आरोग्यासाठी आहेत अतिशय गुणकारी; प्राध्यापकाने केला नावीन्यपूर्ण प्रयोग

* अति थकव्याने बरेचदा डोळे सुजतात. अशा वेळी आईस ट्रेमध्ये कॉफीमिश्रित पाणी घाला. ते फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून द्या. या बर्फाने सूज आलेल्या भागावर शेक द्या. यामुळे डोळ्यांची सूज उतरेल आणि डोळ्यांना थंडावा मिळेल.

संपादन - स्वाती हुद्दार

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coffee's birth story