राज्यात थंडी पुन्हा वाढणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

पुणे - पुण्यासह दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणातील ढगाळ वातावरण कमी होत असून, पुढील चोवीस तासांमध्ये हवामान कोरडे होईल, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली आहे. आकाश निरभ्र होणार असल्याने राज्यातील थंडी पुन्हा वाढेल, असेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वरदा चक्रीवादळ कर्नाटकच्या पूर्व भागात येऊन शमले; पण त्याच्याबरोबर आलेले बाष्प दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रावर जमा झाले होते, त्यामुळे या भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाळी वातावरण होते. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा कमी झाला होता, तर किमान तापमानात वाढ झाली होती. हे वातावरण आता बदलत असून, आकाश निरभ्र होत आहे. पुढील दोन दिवस राज्यातील वातावरण कोरडे राहणार आहे, त्यामुळे किमान तापमानाचा पारा पुन्हा सरासरीपर्यंत खाली जाण्याची शक्‍यता हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आली आहे.

पुण्यात किमान तापमान 18.9 अंश सेल्सिअसवर
शहरात किमान तापमानाचा पारा 18.9 अंश सेल्सिअसपर्यंत वाढला आहे. सरासरीपेक्षा 7.7 अंश सेल्सिअसने हे तापमान वाढले आहे. हे गेल्या दहा वर्षांमधील उच्चांकी किमान तापमान असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. दिवसाचे तापमान 28 अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाले होते. राज्यात नागपूर येथे सर्वांत कमी म्हणजे 10.5 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदले गेले. पुढील दोन दिवसांमध्ये किमान तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

Web Title: cold increase in maharashtra