निफाड @ सहा अंश

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

पुणे - राज्यात कोरडे हवामान झाल्याने किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे.  गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे ६.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

राज्यात वाढलेल्या थंडीमुळे राज्यातील अनेक भागांत धुक्याची चादर परसली आहे. यामुळे किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत ५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. वाढलेल्या थंडीमुळे ग्रामीण भागात ऊब मिळविण्यासाठी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. मध्य महाराष्ट्रातील नगरमध्ये सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसने घट होऊन ६.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.  

उत्तर भारतातील हरियाना, चंडीगड, दिल्ली, सौराष्ट्र आणि कच्छ या भागातही थंडीने चांगलाच जम बसविला आहे. मराठवाड्यातही गारठा वाढला असून, किमान तापमान सरासरीच्या तुलनेत चार अंशांपर्यंत घसरले असून, विदर्भातही थंडीचा जोर होता. विदर्भातील नागपूर येथे ८.६ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली.

किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
 पुणे ८.८, नगर ६.४, जळगाव ९.०, महाबळेश्वर ११.०, मालेगाव ९.६, नाशिक ९.३, निफाड ६, सातारा १०.७, औरंगाबाद ८.०, परभणी ९.९, नांदेड १०, अकोला १०.२, अमरावती १०.६, बुलडाणा १०.४, चंद्रपूर १०.२, नागपूर ८.६,  यवतमाळ ९.४

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cold Temperature Decrease