थंडीच्या लाटेचा विदर्भात इशारा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

पुणे - पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात अंशत: ढगाळ हवामान होत आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. तर विदर्भात मात्र गारठा कायम आहे. उद्यापासून (ता. २७) किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता असल्याने राज्यात गारठा वाढण्याचा अंदाज आहे. तर विदर्भात थंडीची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्र ते दक्षिण अंतर्गत कर्नाटकदरम्यान हवेचा कमी दाबाचा पट्टा (द्रोणीय स्थिती) सक्रिय आहे.  बंगालच्या उपसागरावरून दमट वाऱ्यांचे प्रवाह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याकडे येत असल्याने या भागाच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. तर विदर्भात मात्र सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद होत असून, गारठा कायम आहे. गोंदिया येथे राज्यातील नीचांकी ८.५ अंश सेल्सिअस, तर नागपूर येथे ९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 

मंगळवारी (ता. २५) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) - पुणे १५.९, जळगाव १२.०, कोल्हापूर १९.६, महाबळेश्‍वर १५.६, नाशिक १४.३, सातारा १६.४, सोलापूर १८.१, आैरंगाबाद १५.४, नांदेड १५.५ अकोला १४.६, अमरावती १३.२, नागपूर ९.४.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cold Vidarbha Environment