पुणे यंदा प्रथमच गारठले; राज्यात थंडीचा कडाका 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

पुणे : काही दिवसांपासून गायब झालेल्या थंडीने राज्यात दणक्‍यात पुनरागमन केले आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस थंडीमुळे आता चांगलीच हुडहुडी भरू लागली आहे. पुणे शहरामध्ये आज (शुक्रवार) सकाळी 7.4 अंश तापमानाची नोंद झाली आहे.

यंदाच्या हिवाळ्यातील हे पुण्यातील नीचांकी तापमान आहे. पुण्याजवळच्या ग्रामीण भागामध्येही सकाळी दाट धुके पडले होते. 

नाशिक विभागातही पारा घसरला आहे. निफाडमध्ये थंडीची लाट कायम आहे. निफाडला आज सकाळी 4 अंश तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, नाशिक आणि निफाडमध्ये आणखी दोन दिवस थंडी कायम राहणार आहे. निफाडला काल (गुरुवार) 1.8 अंश तापमान होते. 

महाबळेश्‍वरमध्येही थंडीचा कडाका वाढला आहे. वेण्णा लेक आणि लिंगमळा परिसरात दवबिंदू गोठले. या भागातील पारा आज पहाटे 4 अंशांपर्यंत खाली आला होता. 

नागपूरमध्ये आज सकाळी 20 अंश तापमान होते, तर बुलढाण्यामध्ये 10 अंश तापमान होते. बीडमध्ये 15, रायगडमध्ये 16 आणि पालघरमध्ये 18 अंश तापमानाची नोंद आहे. अकोला (8.5), परभणी (10), लातूर (11), वर्धा (10.5), धुळे (3.2) येथेही थंडी आहे.

Web Title: Cold wave in Maharashtra with Pune at 7.4 Degrees

टॅग्स