रंगूनि रंगात साऱ्या

वृत्तसंस्था
सोमवार, 13 मार्च 2017

 

 

फाल्गुन महिना आला की वेध लागतात ते होळी, रंगपंचमी, धुळवडीचे. होळीच्या रंगांत रंगण्यासाठी रंगांची खरेदी केली असेलच ना? रंग खेळण्यापूर्वी काही टिप्स लक्षात ठेवा...
रंग खेळण्याची तयारी अगदी कपड्यांपासूनच सुरू करा. म्हणजे नवीन कपडे खरेदी करा, असे नाही. जुने कपडे बाहेर काढा म्हणजे ते खराब झाले तरी चिंता नाही.
- पाण्याचा अपव्यय टाळावा. आजूबाजूच्या घरात बसलेल्या लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या.
- रंग खेळताना आपले स्मार्टफोन प्लॅस्टिक कव्हरमध्ये सुरक्षित ठेवावेत. या काळात जुना हॅण्डसेट काढून तोच वापरणे अधिक श्रेयस्कर.
- सोसायटीत खेळताना शक्‍यतो मोकळ्या जागेचा वापर करा. पिण्याच्या पाण्याच्या स्रोताजवळ खेळणे शक्‍यतो टाळावे.
- तुमच्या त्वचेला जर रासायनिक रंगांची ऍलर्जी असल्यास खेळणे टाळा.
- रंग खेळण्यापूर्वी हातापायांना तेल लावून जावे त्यामुळे त्वचेचे नुकसान होत नाही.
- रंग खेळून आल्यानंतर स्वच्छ अंघोळ करून हातापायांना सनक्रीम किंवा मॉईश्‍चरायजर लावावे.
- रासायनिक रंग खेळण्याऐवजी पर्यावरणपूरक असे हळद, बीट, पाने, फुले यांपासून केलेले रंग वापरावेत. हे रंग बाजारात मिळतात, ते अवश्‍य खरेदी करावेत.
- केसांची हानी टाळण्यासाठी तेल लावल्यास केस मऊ राहतील. तसेच अंघोळ करताना हर्बल सुगंधी शाम्पूने केस स्वच्छ धुवावेत.
- रंग खेळताना डोळ्यात लेन्स लावू नयेत. तसेच आपल्या कान, नाक व डोळ्यांत रंग जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
- सोसायटीच्या गच्चीत रंग खेळत असाल तर त्याचा त्रास रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना होणार नाही याची खबरदारी घ्या.
- रंगपंचमी खेळल्यानंतर लगेच उन्हात बसू नये. त्यामुळे केस कडक होण्याची आणि त्वचेवर विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता असते.
 
Web Title: colorful holi celebration