आघाडीला चांगले यश मिळेल - पटेल

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 5 जानेवारी 2019

मुंबई - ‘आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू आहे. समविचारी पक्ष राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीमध्ये समाविष्ट व्हावेत, यादृष्टीने आमची चर्चा सुरू आहे. आगामी निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आमच्या आघाडीला चांगले यश मिळेल,’ अशी आशा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली.

पटेल म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभाराबाबत मोठी नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर येत्या लोकसभेत आमची काय भूमिका असावी, यासंदर्भात चर्चा सुरू आहे. शिवाय या सरकारने काँग्रेस आणि आमच्यावर भ्रष्टाचाराची तोफ डागली होती; परंतु आज तेच स्वत: राफेलच्या मुद्‌द्‌यावर अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांचा या सरकारबद्दल नाराजीचा सूर आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगण या निवडणुकांमध्ये जनतेने भाजपच्या नीतीविरोधात मतदान केले. मोदींची आश्वासने म्हणजे फक्त निवडणुकांमधील घोषणा होत्या, हे आता सिद्ध झाले आहे आणि आता आपली फसवणूक झाल्याचे लोकांना कळून चुकले आहे, असेही पटेल या वेळी म्हणाले.

Web Title: coming election NCP-Congress alliance will be successful in Maharashtra