तर आयुक्तांची चौकशी होईल 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

सांगली : नागरी सुविधांसाठी नागरिकांनी आंदोलन केले पाहिजे, आवाज उठविला पाहिजे. त्यांना उत्तर देऊन प्रश्‍न सोडविणे हे अधिकाऱ्यांचे काम आहे. महापालिकेत आयुक्त येतच नसतील तर ते गंभीर आहे. त्यांची चौकशी केली जाईल, असे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात पत्रकार बैठक झाली. काल (ता. 2) या कक्षात शामरावनगरसह गुंठेवारी भागातील काही नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर लोटांगण घातले होते. आयुक्त रवींद्र खेबुडकर फिरकत नाहीत, तेथे अधिकारी येत नाहीत, समस्या सोडवत नाहीत, अशी तक्रार केली होती. त्याकडे लक्ष वेधले असता देशमुख यांनी चौकशी होईल, असे सांगितले. महापालिकेच्या प्रश्‍नांत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्याशिवाय लक्ष घालणार नाही का, या प्रश्‍नावर त्यांनी आम्ही विकासासाठी नेहमीच बांधील आहोत, असे सांगितले. 

Web Title: The Commissioner will be inquired