महिला तुरुंग कर्मचाऱ्यांच्या लैंगिक छळाविरोधात समिती 

महिला तुरुंग कर्मचाऱ्यांच्या लैंगिक छळाविरोधात समिती 

मुंबई : तुरुंगात काम करणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारींसाठी चार सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीचा कार्यकाळ एका वर्षाचा आहे. महिलांना ई-मेल, पत्राद्वारे तक्रारी करता येतील, असे सांगण्यात आले. 

राज्यात तुरुंग प्रशासनाच्या अखत्यारीत नऊ मध्यवर्ती तुरुंग, 31 जिल्हा तुरुंग, 13 खुले तुरुंग आणि पुणे व मुंबईत महिलांसाठी वेगळे तुरुंग आहेत. तुरुंगात काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांचा लैंगिक छळ झाल्याच्या घटना घडल्याच्या नोंदी आहेत. अशा एका प्रकरणात तुरुंगातील एका अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले होते. दक्षिण विभागातील एका वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्यावरही महिला अधिकाऱ्याचाच लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. 

या सर्व घटनांची गंभीर दखल तुरुंग प्रशासनाने घेतली आहे. सरकारी सेवेतील महिला अधिकारी-कर्मचारी यांच्या समस्यांच्या तपासणीसाठी मे महिन्यात कार्यालयाच्या मुख्यालयात तक्रार निवारण समिती स्थापन झाली होती; परंतु तुरुंग अधीक्षकांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात आलेल्या लैंगिक छळाच्या तक्रारी हाताळण्यासाठी राज्य स्तरावर समिती नव्हती. त्यामुळे अशा समितीच्या नियुक्तीचे आदेश अप्पर पोलिस महासंचालक राजवर्धन यांनी नुकतेच जारी केले. 

समितीचे सदस्य 
उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत भायखळा तुरुंगाच्या अधीक्षक अरुणा मुर्गटराव, वर्षा कणिकदळे (प्रकल्प संचालक) आणि सुनील ढमाळ (उपअधीक्षक) यांचा समावेश आहे. या समितीचा कार्यकाळ एका वर्षाचा असेल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com