साखर कारखान्यांच्या अभ्यासासाठी समिती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

मुंबई - राज्यातील सहकारी साखर कारखान्याच्या सर्वांगीण अभ्यासासाठी सहकार खात्याने साखर क्षेत्रातील अनुभवी अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली आहे. या समितीला अभ्यासाची कक्षा आखून दिली असून सहकारी साखर कारखान्याच्या कामाचे मूल्यमापन करणे, गुणात्मक सुधारणा करणे यावर ही समिती भर देणार आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत समितीचा अभ्यास पूर्ण होणार आहे.

अभ्यास करताना ही समिती महत्त्वाचे मुद्दे विचारात घेणार आहे. यामध्ये सहकारी साखर कारखाना स्थापन करण्यामागचा उद्देश काय होता? अडचणी सोडवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील? आणि इतर मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे. 

Web Title: Committee for the study of sugar factories

टॅग्स