कॉमन मॅन हेच सूत्र - मोदी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

मुंबई - सामान्य माणूस हे आपल्या कामाचे, चिंतनाचे क्षेत्र असल्याचे अधोरेखित करण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला. राजभवनात दिवंगत व्यंग्यचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या चित्रांचे ‘टाइमलेस लक्ष्मण’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना ते बोलत होते.

आज हवाई चप्पल घालणारे विमानातून प्रवास करतात, रेल्वेच्या एसी कोचमधून प्रवास करणाऱ्यांपेक्षा विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे, असे त्यांनी अभिमानपूर्वक सांगितले. लक्ष्मण यांनी कुंचल्यातून अजरामर केलेल्या कॉमन मॅन संकल्पनेचा आधार घेत मोदी म्हणाले. वाजपेयी पंतप्रधान असताना मी एक सामान्य कार्यकर्ता होतो. त्यांच्या भेटीची वेळ मिळाली तरी धन्य वाटायचे. एकदा भेटायला मिळतेय हेच भाग्य या पुलकित भावनेने मी गेलो अन्‌ नम्रपणे म्हणालो, की राजेमहाराजांचे दिवस गेले. एअर इंडियावर महाराजाची प्रतिमा का? लगेचच तेथे महाराजाऐवजी कॉमन मॅन झळकू लागला. अटलजींनी माझे निवेदन मान्य केले. आर. के. लक्ष्मण यांच्या कादंबरीकार भावाचा नारायण यांचाही त्यांनी उल्लेख केला. ते म्हणाले, की लक्ष्मण यांनी व्यंग्यावर बोट तर ठेवले, पण त्यातून शत्रू निर्माण केले नाहीत. नाकाची तीव्रता त्यांनी लक्षात आणून दिली. स्वत:च्या भूमिकेतून कॉमन मॅन चितारला. त्यांचा कॉमन मॅन हा कोणत्याही विशिष्ट प्रांतातल्या, दाक्षिणात्य नागरिकासारखा नाही, तर भारतीयासारखा दिसतो हे विशेष. राजभवनात झालेल्या या कार्यक्रमाला राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच लक्ष्मण यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

Web Title: Common Man Narendra Modi