यंदा गुणांची खैरात; गेल्यावर्षी पेक्षा निकाल 18.20 टक्‍यांनी वाढला

ब्रिजमोहन पाटील
Wednesday, 29 July 2020

- गेल्यावर्षी पेक्षा यंदाचा निकाल 18.20 टक्‍यांनी वाढला
- कोकण विभागाचा सर्वाधीक 98.77 टक्के, तर औरंगाबादचा सर्वात कमी 92 टक्‍के
- पुणे विभाग 97.34 टक्‍क्‍यांसह तिसऱ्या स्थानी

पुणे :"कोरोना'च्या दहशतीच्या छायेखाली विद्यार्थ्यांनी दिलेली परीक्षा, कडक लॉकडाऊनच्या संकटातून मार्ग काढता उत्तरपत्रिका तपासण्याचे स्विकारलेले आव्हान अशा कठीण काळात समस्यांवर मात करत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 10वीची परीक्षेचा निकाल बुधवारी ऑनलाईन जाहीर केला. गेल्या 15 वर्षांचे रेकॉर्ड मोडीत काढून यंदाचा निकाल तब्बल 95.30 टक्के इतका लागला. तर गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाच निकाल तब्बल 18. 20 टक्‍क्‍यांनी वाढला असल्याने गुणांची खैरात केल्याचेच स्पष्ट झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

इयत्ता 10वीची परीक्षा झाल्यानंतर तब्बल 131 दिवसांनी निकालाची घोषणा करण्यात आली. यावेळी मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सचिव अशोक भोसले यावेळी उपस्थित होते. परीक्षेसाठी 15 लाख 84 हजार 264 जणांनी अर्ज भरले होते. त्यापैकी 15 लाख 75 हजार 103 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर त्यापैकी 15 लाख 1 हजार 105 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालामध्ये मुलींनी पुन्हा एकदा मुलांना मागे टाकत गुणवत्ता सिद्ध केली आहे. राज्यातील परीक्षा दिलेल्यापैकी 96.91 टक्के मुली आणि 93.90 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. विद्यार्थिंनींच्या निकालाची टक्केवारी ही विद्यार्थ्यांपेक्षा 3.01 टक्‍क्‍यांनी जास्त आहे. राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 98.77 टक्के लागला तर औरंगाबादचा निकाल सर्वात कमी 92 टक्के इतका लागला आहे. निकालात खासगीरित्या प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 42 हजार 309 असून त्यातील 73.75 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 92.73 टक्के लागला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

म्हणून वाढली टक्केवारी
2019 मध्ये इयत्ता 10वीच्या शालान्त परीक्षेसाठी अंतर्गत मूल्यमापन, कृतीपत्रीका हे रद्द करून सर्व गुण लेखीपरीक्षेद्वारेच देण्यात आले होते. त्यामुळे राज्याचा निकाल 77.10 टक्के एवढा कमी लागला होता. याचा फटका 11वीला प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना बसला. त्यानंतर 2020 मध्ये पालक, विद्यार्थ्यांनी या नियमात बदल करून सर्व विषयांसाठी 80 गुणांची लेखी परीक्षा तर 20 गुणांची अंतर्गत मूल्यमापनाची परीक्षा घेण्यात आली, त्यामुळे विद्यार्थ्यांना भरपूर गुण मिळाल्याने निकालाची टक्केवारी वाढली आहे.

एकूण नोंदणी केलेले नियमित विद्यार्थी : 15 लाख 84 हजार 264
परीक्षा दिलेले विद्यार्थी : 15लाख 75 हजार 103
उत्तीर्ण विद्यार्थी : 15 लाख 1 हजार 105
निकालाची टक्केवारी : 95.30 टक्के
नोंदणी केलेले पुनर्परिक्षार्थी विद्यार्थी : 1लाख 81 हजार 565
परीक्षा दिलेले विद्यार्थी : 1 लाख 79 हजार 264
उत्तीर्ण विद्यार्थी : 1 लाख 35 हजार 991
निकालाची टक्केवारी : 75.86 टक्के

विभागानुसार निकाल 2020 

Image may contain: text that says "सकाळ विभागानुसार निकाल 2020 2019 97.34 % 82.48 % 93.84 % 67.28 % 92.00 % 75.20 % विभाग पुणे नागपूर औरंगाबाद मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर कोकण 96.72 % 77.04 % 97.64 % 86.56 % 95.14 % 71.98 % 93.73 % 77.58 % 93.09 % 72.87 % 98.77 % 97.34 %"

श्रेणीनिहाय निकाल :

विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणी (75 टक्‍क्‍यांच्या पुढे) :
विद्यार्थी संख्या- 5 लाख 39 हजार 373
प्रथम श्रेणी ( 60 टक्के व पुढे पुढे)
विद्यार्थी संख्या - 5 लाख 50 हजार 809
द्वितीय श्रेणी (45 टक्के व पुढे)
विद्यार्थी संख्या - 3 लाख 30 हजार 588
उत्तीर्ण श्रेणी (35 टक्के व पुढे)
विद्यार्थी संख्या - 80 हजार 335

शून्य ते 100 टक्‍के निकाल लागलेल्या शाळा

Image may contain: text that says "सकाळ शून्य ते 100 टक्के निकाल लागलेल्या शाळा 28 4 19 0 ते 10% 10.01 ते 20% 20.1 ते 30% 30.1 ते 40% 40.1 ते 50% 50.1 ते 60% 60.1 ते 70% 70.1 ते 80% 80.1 ते 90% 90.1 ते 90% 100 % एकुण 34 86 154 327 888 2813 9857 8360 22,570"

ऐकावे ते नवलच! कोरोनाने मृत्यू झालेली 'ती' झाली पुन्हा जिवंत

"कोरोनाच्या काळात उत्तरपत्रिका तपाण्याचे आव्हान शिक्षक व सर्व विभागीय मंडळांनी स्विकारले. निकाल लावण्यास काहीसा उशीर झाला आहे, पण वेळेच्या आत लावल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास, अंतर्गत मुल्यामापन, कृतीपत्रीका यामुळे निकालाची टक्केवारी वाढील आहे. गेल्या 15 वर्षात प्रथमच एवढा जास्त निकाल लागला आहे. कोरोनामुळे रद्द केलेल्या भूगोलाच्या पेरला सरासरी गुण दिल्याने या विषयाचा निकाल 100 टक्के लागला आहे. या सर्व प्रक्रियेबाबत आम्ही समाधानी आहोत.''
- शकुंतला काळे, अध्यक्षा, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

राज्यात दहावीचा निकाल लागला ९५ टक्के : यंदाही मुलींनीच मारली बाजी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Compared to last year this year maharashtra ssc result has increased by 18.20 percent