तयारी स्पर्धापरीक्षांची...

टीम ई सकाळ
मंगळवार, 23 मे 2017

बुधवार दिनांक 24 मे पासून स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील लेख www.esakal.com वर प्रसिद्ध करण्यात येतील. 
 

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांना परिक्षेच्या दृष्टिकोनातून चालू घडामोडी व सामान्य अध्ययन या संदर्भातील महत्त्वाची व सखोल माहिती आवश्यक असते. यासाठीच बुधवार दिनांक 24 मे पासून 'ई सकाळ' तर्फे राज्य व केंद्रिय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी 'ऑनलाइन' लेखमाला सुरु करण्यात येत आहे.

यामध्ये विज्ञान तंत्रज्ञान, पर्यावरण, कृषी, क्रीडा, राष्ट्रीय/ आंतरराष्ट्रीय पुरस्कार, आर्थिक घडामोडी, न्यायालयीन/ शासन निर्णय, शासनाच्या विविध योजना, राजकीय/ राष्ट्रीय/ आंतरराष्ट्रीय घडामोडी इ. विषयांवरील सखोल माहितीसह तज्ज्ञांचे विशेष लेख www.esakal.com वर प्रसिद्ध करण्यात येतील. 

MPSC तसेच UPSC अंतर्गत येत्या काही दिवसांत होणाऱ्या विविध परीक्षांच्या तयारीसाठी ही माहिती विद्यार्थ्यांना नक्कीच उपयूक्त ठरेल.

 

Web Title: Competetive Exam series by Esakal

टॅग्स