खासदार उदयनराजेंविरूद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह दहाजणांविरुद्ध खंडणी व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडाळा तालुक्‍यातील सोना अलायन्स कंपनीचे मालक राजीवकुमार जैन यांनी फिर्याद दिली आ

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह दहाजणांविरुद्ध खंडणी व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडाळा तालुक्‍यातील सोना अलायन्स कंपनीचे मालक राजीवकुमार जैन यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी नऊ संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. उदयनराजे यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.

सातारा जिल्ह्यात लोणंदजवळ सोना अलाईज नावाची कंपनी आहे. या कंपनीत उदयनराजे यांच्या नेतृत्वात काम करणारी एक माथाडी कामगार संघटना आहे. तर दुसऱ्या संघटनेचं नेतृत्व रामराजे निंबाळकर करतात. कंपनी रामराजेंच्या संघटनेला झुकतं माप देते, त्यांना अधिक काम देते, असा उदयनराजेंचा आरोप होता. या वादातून उदयनराजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना राजीवकुमार जैन यांना मारहाण केली आणि काही ऐवज काढून घेतला, अशी तक्रार जैन यांनी केली आहे. त्यामुळे उदयनराजेंविरूद्ध खंडणी आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Complaint against MP Udyanraje Bhosale