MPSC : आयोगाच्या संकेतस्थळाबाबत उमेदवारांच्या तक्रारी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) संकेतस्थळावरील आमचा अर्ज अजूनही ‘अपडेट’ झाला नाही. आयोगाने यात लक्ष घालून अचूक माहिती अद्ययावत करावी.
MPSC
MPSCsakal
Summary

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) संकेतस्थळावरील आमचा अर्ज अजूनही ‘अपडेट’ झाला नाही. आयोगाने यात लक्ष घालून अचूक माहिती अद्ययावत करावी.

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) (MPSC) संकेतस्थळावरील आमचा अर्ज अजूनही ‘अपडेट’ (Update) झाला नाही. आयोगाने यात लक्ष घालून अचूक माहिती (Information) अद्ययावत करावी, तसेच २०१९च्या संयुक्त गट ब मुख्य परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवावी, अशी मागणी उमेदवारांच्या (Candidate) वतीने करण्यात आली आहे. ‘आयोगाच्या उदासीनतेचा उमेदवारांना फटका’ या मथळ्याखाली सकाळने शुक्रवारी (ता. २४) प्रसिद्ध केलेल्या बातमीनंतर अनेक उमेदवारांनी अडचणी कळविल्या आहेत. त्यातील निवडक प्रतिक्रिया..

राज्यसेवा संयुक्त गट-ब परीक्षेसाठी मी अर्ज केला आहे. मुख्य परीक्षेसाठी मी पात्र ठरलो. मराठा आरक्षण न्यायालयाने रद्द केल्यानंतर मी अर्जात आर्थिक दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) हा रकाना सिलेक्ट केला. परंतू, अजूनही ते संकेतस्थळावर दिसत नाही.

- राहुल जाधव, तालुका व जिल्हा नांदेड

पूर्व परीक्षेचा अर्ज ईडब्ल्यूएस प्रवर्गातून भरला होता. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड केले होते. शेवटी खात्री पण करून घेतली होती. आता मात्र पीएसआय मुख्य परीक्षेचा अर्ज भरताना अनारक्षीत दाखवत आहे. आयोगाकडे तक्रार केली मात्र ते पुरावा म्हणून त्यावेळेसचा स्क्रिनशॉट पाठवाम्हणून सांगितले. मुळात संकेतस्थळावर अर्ज दाखल करताना स्क्रिनशॉट काढावा असे कोठेच नमुद केलेले नाही. आयोगाकडून काही मुलांची माहिती गहाळ झाल्याची शक्यता आहे. सोमवारी (ता.२७) अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. आम्हाला प्रचंड मानसिक त्रास होत आहे.

- अक्षय देसाई

सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (एसईबीसी) आरक्षण रद्द झाल्यानंतर मी ईडब्ल्यूएस मधून अर्ज अद्ययावत केला. तरी पीएसआय मुख्य परीक्षेसाठी अजूनही अर्ज खुल्या प्रवर्गातून दाखविला जात आहे. अशाच प्रकारे मला मुख्य परीक्षेसाठीही खुल्या प्रवर्गातून अर्ज भरावा लागला आहे.

- संदीप नारायण निहाळ, औरंगाबाद

पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा २०२० साठी अर्ज करताना माझ्या प्रोफाईलमध्ये जुनी अथवा चुकीची माहिती दाखवत आहे. मी उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे २०२१चे प्रमाणपत्र अपडेट केले आहे. मात्र संकेतस्थळावर २०१८चेच प्रमाणपत्र दाखवत आहे. तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र असतानाही संकेतस्थळावर ‘नो’ असे म्हटले आहे.

- चेतन अनिलराव पाथरे

MPSC
देवराष्ट्रेचा दत्तात्रय पाहतोय महिंद्रा' यांच्या बोलेरोची वाट

संकेतस्थळावर ईडब्ल्यूएससाठी योग्य ती कार्यवाही केली आहे. तेंव्हा अपडेट केले होते. आता मात्र अनारक्षीत कोटा दाखवत आहे.

- अजित कापसे, बार्शी, सोलापूर

उमेदवार म्हणतात...

- आयोगाकडून काही उमेदवारांची माहिती गहाळ झाली आहे

- संकेतस्थळावर भरलेली माहिती अजूनही अपडेट नाही

- संयुक्त गट ब मुख्य परीक्षेची अर्ज करण्याची अंतिम मुदत २७ डिसेंबर आहे, ती वाढवून मिळावी

- इडब्ल्यूएस आणि नॉन क्रिमीलीयर संदर्भातील अर्जातील त्रुटी त्वरित सुधराव्यात

- स्क्रिनशॉट किंवा पुरावा दाखवणे आता शक्य नाही

आयोगाच्या संकेतस्थळाबद्दल तुमची काही तक्रार आहे का? कळवा आम्हाला पुढील व्हॉट्सअप क्रमांकाद्वारे, ८४८४९७३६०२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com