संगणक परिचारलकांची विधिमंडळावर धडक 

संगणक परिचारलकांची विधिमंडळावर धडक 

मुंबई - राज्यातील हजारो संगणक परिचालक 27 नोव्हेंबर रोजी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावेळी मोर्चा काढणार आहेत. वेळेवर पगार आणि महाराष्ट्र आयटी महामंडळाकडून नियुक्ती ही संगणक परिचालकांची प्रमुख मागणी आहे. वेळेवर पगार होत नसल्यामुळे राज्यभरातील संगणक परिचालक कर्जबाजारी झाले आहेत. 

हिवाळी अधिवेशनावर राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावरील सुमारे 25 हजार संगणक परिचालकांसह 27 नोव्हेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे राज्य अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी दिली. मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

राज्यातील 27864 ग्रामपंचायती, 351 पंचायत समिती आणि 34 जिल्हा परिषदेचे सर्व प्रकारचे ऑनलाइन तसेच ऑफलाइन काम संगणक परिचालक करतात. त्या संगणक परिचालकांना सरकारकडून हक्काचे मानधन एक ते दीड वर्ष मिळत नाही. त्यामुळे संगणक परिचालकावर उपासमारीची वेळ आली आहे. शिवाय बोगस कंपन्यांमार्फत या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com