esakal | मोदी सरकारविरोधात काँग्रेस आक्रमक
sakal

बोलून बातमी शोधा

balasaheb-thorat

राज्यव्यापी आंदोलन २९ जूनला
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती नीचांकी पातळीवर खाली आलेल्या असतानाही मोदी सरकार त्याचा थेट लाभ सामान्य जनतेला होऊ देत नाही. याउलट सलग १९ दिवसांपासून पेट्रोल- डिझेलच्या किमतीत वाढच केली जात आहे. याच पार्श्‍वभूमीवर सोमवारी २९ जूनला केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केले जाणार आहे.

मोदी सरकारविरोधात काँग्रेस आक्रमक

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने चीनसमोर सपशेल शरणागती पत्करली आहे. चीनने २० भारतीय जवानांना निर्दयीपणे मारले, तरीही मोदी सरकार गप्प आहे. दुसरीकडे देश कोरोनाच्या विळख्यात सापडला असताना, पेट्रोल- डिझेल दरवाढ करून जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचा उद्योग सुरू आहे. चीनबाबतचे कुचकामी धोरण व अन्यायी इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून केंद्र सरकारला जाब विचारणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मोदी सरकारने देशाला जवानांबाबत माहिती दडवण्याचा प्रयत्न केला, तसेच चिनी सैन्याने सीमा ओलांडली नाही, अशी चीनला फायदा होणारी भूमिका घेऊन मोदींनी हुतात्मा जवानांचा अपमान केला आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करत आहे. २० वीर जवानांप्रती आदरभावना व्यक्त करण्यासाठी शुक्रवारी २६ जूनला ‘शहिदों को सलाम’ दिवस पाळला जाणार आहे.

‘पतंजली’च्या कोरोनिलवर राज्यात बंदी - देशमुख 