Mon, May 29, 2023

“…म्हणून आम्हाला सावध राहावं लागणार” महादेव जानकरांचं मोठं विधान Mahadev Jankar
Published on : 21 February 2023, 3:08 pm
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शुक्रवारी शिवसेना पक्षचिन्हाबाबत मोठा निर्णय दिला आहे. आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं आहे.
या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान आता राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी सावध भूमिका घेत भाजपवर टीका केली आहे.
जानकर यांनी आज प्रसारमाध्यमाना प्रतिक्रिया दिली आहे. म्हणाले की, मंत्री असताना मी सांगायचो की काँग्रेस आणि भाजपा दोन्ही फसवे पक्ष आहेत.
आम्ही बाहुले नाही, तर पक्षाचे मालक आहोत. हे पक्ष जसा मोठा मासा छोट्या माशाला खातो तसं आम्हाला खात आहेत.
त्यामुळे आता आम्हाल सावध राहावे लागणार आहे, आता काँग्रेसचीच भाजप झाली आहे. असा हल्लाबोल जानकर यांनी केला आहे.