आघाडीत 8 जागांचा पेच कायम; महाडिकांची उमेदवारी निश्‍चित 

आघाडीत 8 जागांचा पेच कायम; महाडिकांची उमेदवारी निश्‍चित 

मुंबई -  लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे चाळीस लोकसभा मतदारसंघांच्या वाटपावर एकमत झाले असून, उर्वरित आठ जागांचा पेच मात्र कायम आहे. मित्रपक्षांच्या निर्णयानंतर याबाबत एकमत होईल, असे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यातील पाच लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांबाबत तोडगा काढण्यासाठी मॅरेथॉन बैठक झाली. 

या वेळी पत्रकार परिषदेत बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, ""कॉंग्रेस आणि समविचारी पक्ष आघाडीमध्ये समाविष्ट व्हावेत यादृष्टीने आमची चर्चा सुरू आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात आघाडीला भरघोस यश मिळेल.'' 

दरम्यान, रायगड लोकसभेसाठी सुनील तटकरे यांच्या नावावर आज पवार यांनी शिक्‍कामोर्तब केले. गुरुवारी (ता. 10) रायगड येथून सुरू होणाऱ्या परिवर्तन यात्रेच्या वेळी तटकरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाईल. सुनील तटकरे यांच्या जागेवर माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी दावा केला होता. मात्र, पक्षाने सुनील तटकरे यांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी फॅक्‍टर असतानाही तटकरे यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला होता. 

महाडिकांची उमेदवारी निश्‍चित 
कोल्हापूर लोकसभेसाठी विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांची उमेदवारीदेखील निश्‍चीत करण्यात आली आहे. माजी मंत्री हसन मुश्रीफ यांचा महाडिक यांच्या उमेदवारीला विरोध होता. याशिवाय, नगर, बीड व परभणीच्या उमेदवारांबाबत आजच्या बैठकीत निर्णय झाला नाही. नगरमध्ये कॉंग्रेसचे सुजय विखे यांनी उमेदवारी पुढे केली आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असल्याने आघाडीमध्ये या जागेवरून पेच कायम आहे. परभणीमध्ये आमदार विजय भांबळे यांनीच लोकसभा लढवण्याचा पक्षाचा आग्रह असल्याचे सूत्रांनी सांगितले. बीड लोकसभेसाठीही उमेदवाराची चाचपणी सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com