अजित पवारांमुळे आघाडीत गोंधळ; नेते म्हणतात...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार म्हणाले,' अजित पवार हे मुंबईतच आहेत, ते उद्या माध्यमांसोबत बोलतील आणि ते आघाडीच्या समन्वय बैठकीलाही हजर राहणार आहेत'.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मुंबईत समन्वय समितीची बैठक सुरु होण्यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी आणि काँग्रेस समन्वय समितीची बैठक कधी होईल, याबाबत काहीही माहिती नाही अशी प्रतिक्रिया दिली होती.

यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते. पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी 'No Comments' या व्यतिरिक्त काहीही वक्तव्य केलं नाही. त्यामुळे आघाडीत बिघाडी आहे का? किंवा राष्ट्रवादी पक्षात पदांच्या वाटपावरून काही कलह आहे का? असे प्रश्न उपस्थित केले त्यावेळी आघाडीचे नेते नेमके काय म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार म्हणाले,' अजित पवार हे मुंबईतच आहेत, ते उद्या माध्यमांसोबत बोलतील आणि ते आघाडीच्या समन्वय बैठकीलाही हजर राहणार आहेत'.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणतात, 'काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त बैठक सुरू आहे. सुरुवातीला ही बैठक रद्द झाल्याचे सांगितले गेले. मी देखील माध्यमांना तशी माहिती दिली होती, मात्र नंतर आघाडीच्या नेत्यांच्या उपलब्धतेचा विचार करता ही बैठक घेण्याचे नक्की झाले. किमान समान कार्यक्रमावर आम्ही चर्चा करतोय'.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले,'अजित पवार हे माझ्याबरोबरच मुंबईत आहेत. काँग्रेस नेत्यांशी आमची चर्चाही सुरू आहे.'

- बारामतीला चाललो सांगत अजित पवार पोहोचले आघाडीच्या बैठकीत

अशोक चव्हाण यांनी सांगितले, की ''बैठकीबाबत अद्याप कोणताही निरोप आम्हाला आला नाही. काँग्रेसची बैठक संपली असून, आता राष्ट्रवादीच्या निरोपाची प्रतीक्षा आहे''.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, 'काँग्रेसच्या राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक नियोजित होती. मात्र, त्या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप निरोप आला नाही. आमच्याकडे तशी माहिती नाही. काँग्रेसमधील चर्चा ही प्राथमिक चर्चा होती.' राष्ट्रवादीसोबतच्या बैठकीसाठी नियोजन होते. पण त्यानंतर चर्चा झालेली नाही. आता राष्ट्रवादीच्या निरोपाची प्रतिक्षा आहे.

- अजितदादा म्हणतात No Comments, बंद खोलीत झालं तरी काय?

दरम्यान, आघाडीची बैठक झाली असून आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, नवाब मलिक, धनंजय मुंडे, छगन भुजबळ आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तर काँग्रेसचे माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे नेते उपस्थित होते.

- राजकीय घडामोडी : आज दिवसभरात नेमकं काय घडलं?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress and NCP leaders commented about NCP leader Ajit Pawar