Loksabha 2019 : काँग्रेसचे महाराष्ट्रातील सात उमेदवार जाहीर; पाहा कोणाला उमेदवारी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मार्च 2019

दक्षिण मध्य मुंबईतून एकनाथ गायकवाड, शिर्डीतून भाऊसाहेब कांबळे, यवतमाळ-वाशिम येथून माणिकराव ठाकरे, धुळे येथून कुणाल पाटील, नंदूरबारमधून के.सी.पडवी, वर्धा येथून चारूलता टोकस आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून नवीनचंद्र बांदिवडेकर यांना रिंगणात उतरविण्यात आले आहे.

नवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी कॉंग्रेसने आज (मंगळवार) रात्री उशिरा दुसरी उमेदवार यादी जाहीर केली, यामध्ये महाराष्ट्रातील सातजणांचा समावेश आहे. 

दक्षिण मध्य मुंबईतून एकनाथ गायकवाड, शिर्डीतून भाऊसाहेब कांबळे, यवतमाळ-वाशिम येथून माणिकराव ठाकरे, धुळे येथून कुणाल पाटील, नंदूरबारमधून के.सी.पडवी, वर्धा येथून चारूलता टोकस आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून नवीनचंद्र बांदिवडेकर यांना रिंगणात उतरविण्यात आले आहे. याशिवाय केरळमधील अलप्पुझा येथून शानिमल उस्मान यांना उमेदवार देण्यात आली आहे. कॉंग्रेस कार्यकारी समितीने या सर्व उमेदवारांच्या नावांवर याआधीच शिक्कामोर्तब केले होते. 

काँग्रेसने यापूर्वी आपल्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश केला होता. आता महाराष्ट्रातील उमेदवारांच्या या दुसऱ्या यादीत सात उमेदवारांचा समावेश आहे. 

Web Title: Congress declared candidate list in Maharashtra