महाराष्ट्रात तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर काँग्रेसची धुरा

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 24 जानेवारी 2019

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या समन्वय समितीचे अध्यक्षपद मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. तर निवडणूक समितीच्या अध्यक्षपदी अशोक चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुशीलकुमार शिंदे यांची प्रचार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली असून, जाहीरनामा समितीचे अध्यक्षपद पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असून, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीने आज काही महत्त्वाच्या पदांवरील नियुक्‍त्या जाहीर केल्या.

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या समन्वय समितीचे अध्यक्षपद मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. तर निवडणूक समितीच्या अध्यक्षपदी अशोक चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुशीलकुमार शिंदे यांची प्रचार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली असून, जाहीरनामा समितीचे अध्यक्षपद पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.

प्रसारमाध्यम समितीचे अध्यक्षपद कुमार केतकर यांच्याकडे देण्यात आले असून, प्रसिद्धी व प्रकाशन समितीचे अध्यक्षपद रत्नाकर महाजन यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.

Web Title: Congress declared Maharashtra election committee and strategy