Vidhan Sabha : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; पृथ्वीराज चव्हाणांना उमेदवारी

टीम ई-सकाळ
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून उमेदवारांची दुसरी यादी आज (मंगळवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये 52 नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून उमेदवारांची दुसरी यादी आज (मंगळवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये 52 नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, यामध्ये कसबा विधानसभा मतदारसंघातून अरविंद शिंदे तर शिवाजीनगरमधून दत्तात्रय बहिरट यांच्या नावांचा समावेश आहे.

तसेच दक्षिण कराडमधून विद्यमान आमदार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, वर्धा मतदारसंघातून शेखर प्रमोद शिंदे यांच्यासह काही जणांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली. याबाबतचे प्रसिद्धी पत्रक काँग्रेसकडून जारी करण्यात आले. 

No photo description available.

दरम्यान, सांगलीतून काँग्रेसची उमेदवारी पृथ्वीराज पाटील यांना मिळाली आहे. पृथ्वीराज पाटील हे गुलाबराव पाटील यांचे पुत्र आहेत. सांगलीत पहिल्यांदाच वसंतदादा घराण्यातील उमेदवार डावलून ही घराणेशाही डावलून उमेदवारी देण्याचा हा धाडसी प्रयोग यंदा करण्यात आला आहे.

No photo description available.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Declared their Second Candidates List for Maharashtra Vidhan Sabha 2019