शिवसेनेचा जल्लोष; मात्र, काँग्रेसचा पाठिंबा नाही

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

काँग्रेस पक्षाने आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा दिल्याचा दावा करत शिवसैनिकांकडून राज्यभरात जल्लोष साजरा केला जात असतानाच काँग्रेसने मात्र अजून अधिकृत पाठिंबा दिलेला नाही. काँग्रेसची ही भूमिका शिवसेनेला आणि सर्वांनाच बुचकळ्यात टाकणारी आहे. 

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाने आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा दिल्याचा दावा करत शिवसैनिकांकडून राज्यभरात जल्लोष साजरा केला जात असतानाच काँग्रेसने मात्र अजून अधिकृत पाठिंबा दिलेला नाही. काँग्रेसची ही भूमिका शिवसेनेला आणि सर्वांनाच बुचकळ्यात टाकणारी आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

काँग्रेस पक्षाकडून एक अधिकृत प्रसिद्धी पत्रक काढले असून त्या पत्रात कुठेही शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सांगितलेले नाही. या पत्रात राष्ट्रवादी पक्षासोबत चर्चा झाली असून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यात चर्चा झाली असल्याचे या पत्रात सांगितले आहे. तसेच, पुढेही पवार आणि सोनिया यांच्यात चर्चा होत राहील असेही म्हटले आहे.

Image may contain: text

काँग्रेसचं पत्र आलं पण, या पत्रात पाठिंब्याचा कुठल्याही प्रकारचा उल्लेख नाही. तसेच, राज्यपालांनी शिवसेनेला दिलेली वेळ संपली असून काँग्रेस मात्र भूमिका जाहीर करत नाही. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे सर्वचजण बुचकळ्यात आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress does not supports Shivsena